श्री रामेश्वर सार्वजनिक वाचन मंदिर आचराचा उपक्रम
आचरा (प्रतिनिधी) : श्री रामेश्वर सार्वजनिक वाचन मंदिर, आचरा या संस्थेने शनिवार दि. 23 नोव्हेंबर 2024 रोजी दुपारी 3 वाजता ‘रामरक्षा स्तोत्र पाठण स्पर्धचे’ आयोजन केले आहे.
स्पर्धक गट इ 3 री ते 5 वी असून रामरक्षा स्तोत्र (संस्कृत) पहिले 10 श्लोक पाठांतर आवश्यक आहेत. स्पर्धेत प्रथम क्रमांकला 151 रु, व्दितीय क्रमांक 100 रु तर तृतीय क्रमांक 75 रु, उत्तेजनार्थ 2 बक्षीसे असून त्यांना 50 रुपये बक्षीस म्हणून दिले जाणार आहेत. तसेच स्पर्धेतील सर्व सहभागी स्पर्धकांना आकर्षक भेटवस्तू दिल्या जाणार आहेत. नाव नोंदणीची अंतिम तारीख 21 नोव्हेंबर 2024 दुपारी 2 वाजे पर्यंत आहे.
आचरा गावातील प्रत्येक शाळेतून स्पर्धेसाठी 3 विद्यार्थी पाठवून स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे तसेच अधिक माहितीसाठी संस्थेच्या ग्रंथपाल सौ. विनिता कांबळी यांच्याशी संपर्क करावा असे आवाहन अध्यक्ष बाबाजी भिसळे, कार्यवाह अर्जुन उर्फ दादा बापर्डेकर, संस्थेच्या कार्यकारीणी व सांस्कृतिक समिती सदस्यांनी केले आहे.