खारेपाटण (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी बी जी कमळकर यांनी आज शुक्रवारी सायंकाळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मॉडेल स्कूल म्हनून ओळखल्या जाणाऱ्या कणकवली तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा खारेपाटण नं.१या शाळेला सदिच्छा भेट देऊन शाळेची पाहणी केली.यावेळी त्यांच्या समवेत उपशिक्षणाधिकारी धनंजय मेंगाने (परीक्षाधिन), कणकवली तालुका गटशिक्षण अधिकारी किशोर गवस आदी मान्यवर अधिकारी वर्ग उपस्थित होते.
अध्यक्ष सौ प्राप्ती कट्टी यांच्या शुभहस्ते शिक्षणाधिकारी श्री कमळकर यांचे शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला.तसेच उपशिक्षणाधिकारी श्री धनंजय मेंगाने यांचा देखील पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष श्रीं मंगेश ब्रम्हदंडे यांच्या शुभहस्ते शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.तर कणकवली गट शिक्षण अधिकारी श्री किशोर गवस यांचा देखील शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष व शिक्षण तज्ञ श्री संतोष पाटणकर यांचे शुभहस्ते शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार करण्यात आला.
यावेळी प्राथमिक शिक्षणा अधिकारी श्री बी जी कमळकर यांनी शाळेच्या सर्व वर्गाना भेटी दिल्या विद्यार्थ्यांशी हितगुज केले तसेच काही वर्गावर स्वतः अध्यापन देखील घेतले.तर शाळेतील शिक्षकांना विशेष मार्गदर्शन केले.तसेच शालेच्या अंतरंग व बाह्यरंगाची पाहणी केली.तसेच मॉडेल स्कूल अंतर्गत शाळेला देण्यात आलेल्या सोयी सुविधांची पाहणी केली.व शाळेच्या नाविन ४ वर्ग खोल्यांचे काम सुरू असलेल्या इमारतीची देखील त्यांनी पाहणी केली.