आचरा (प्रतिनिधी) : आचरा व्यापारी संघटनेच्या अध्यक्षपदी अर्जुन उर्फ दादा बापर्डेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. आचरा तिठा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सभागृहात विद्यमान अध्यक्ष वामन आचरेकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या बैठकीत हि निवड करण्यात आली.
यावेळी आचरा सरपंच जेराॅन फर्नांडिस, मंगेश टेमकर, राजन पांगे, सुरेश हडकर, अजित घाडी, प्रफुल्ल नलावडे, जुबेर काझी, निखिल ढेकणे, गिरीश माटवकर, शंकर नाटेकर, सुधीर मुणगेकर, भरत पटेल यांसह बहुसंख्य व्यापारी उपस्थित होते.
यावेळी उपाध्यक्ष पदी परेश सावंत आणि मंदार सांबारी यांची निवड करण्यात आली. सचिव पदी पंकज आचरेकर तर खजिनदार पदी जयप्रकाश परुळेकर यांची फेरनिवड करण्यात आली.
यावेळी निवडण्यात आलेल्या कार्यकारणी समितीत मंगेश टेमकर, विद्यानंद परब, हेमंत गोवेकर, उदय घाडी, संदीप पांगम, देवेंद्र नलावडे, गजानन गावकर, सिद्धांत हजारे, अर्जुन दुखंडे, सिद्धार्थ कोळगे, चंद्रकांत कदम, शैलेश वळंजू यांची निवड करण्यात आली सल्लागारपदी जेरॉन फर्नांडिस, वामन आचरेकर, राजन पांगे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.