कुडाळ (प्रतिनिधी) : आज कुडाळ तालुक्यातील पावशी येथील जागृत तिर्थक्षेत्र नवनाथ तपोभूमी, देव डोंगर येथे जाणाऱ्या रस्त्याचा शुभारंभ आमदार निलेश राणे यांच्या हस्ते पार पडला, हा रस्ता अतिशय खराब झाला होता, याच डोंगरावर कुडाळ शहराला पाणीपुरवठ्यासाठी करणारी टाकी देखील आहे. त्यासाठी काका कुडाळकर यांच्या जिल्हा नियोजन निधीतून या रस्त्यासाठी निधी खर्ची पडणार आहे. यावेळी राष्ट्रवादीचे काका कुडाळकर,पावशी सरपंच वैशाली पावसकर, दादा साईल, सर्वेश पावसकर, अरविंद करलकर, बंटी तुळसकर आदी उपस्थित होते.