सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : सुकळवाड गावात गेले काही दिवस सातत्याने विजेच्या समस्यांना ग्रामस्थांना सामोरे जावे लागत असल्याने गावातील शिष्टमंडळाने कुडाळ मंडळ महावितरणचे अधीक्षक अभियंता अभिमन्यू राख यांची भेट घेऊन समस्यांचे निवेदन सादर केले. निवेदनाद्वारे सादर केलेल्या मागण्यांत गावासाठी कायमस्वरूपी वायरमन नेमणूक करणे.गावातील विजेचा पुरवठा पूर्ववत ओरोस फिडरवरून करणे.गावात अनेक उद्योग कार्यरत असल्याने व्होल्टेज समस्या सोडविणेसाठी कार्यरत ट्रान्सफॉर्मरची क्षमता वाढविणे व गावासाठी नवीन ट्रान्सफॉर्मर मंजूर करणे या मागण्या मांडण्यात आल्या.
यावेळी श्री.राख यांनी सुकळवाड गावाचा विद्युत पुरवठा ओरोस फिडरवरून करण्याचा आदेश आपल्या अधिनस्त अधिकाऱ्यांना दिला.तसेच कार्यरत तीन पैकी एका ट्रान्सफॉर्मरची क्षमता वाढविणेचा आदेश दिला.तसेच नवीन ट्रान्सफॉर्मर मंजूर करण्याचे आश्वासन दिले.वायरमन देण्याबाबत बहुतांशी पदे रिक्त असल्याने आऊट सोर्सिंगने एक वायरमन देण्याचे मान्य केले.
यावेळी सुकळवाड गावचे उपसरपंच किशोर पेडणेकर, तंटामुक्ती अध्यक्ष बाबुराव मसुरकर,भाऊ पाताडे, माजी सभापती प्रसाद मोरजकर,माजी उपसरपंच सागर कुशे,स्वप्नील गावडे,विशाल वाळके, तसेच सुनील पाताडे, चंद्रसेन पाताडे,शरद पाताडे,नागेश पाताडे,सुनील पालकर,अनिल पालकर,मोरेश्वर मसुरकर,जनार्दन पेडणेकर,गणपत हिंदळेकर,प्रवीण मोरजकर, गुरुनाथ बांदेकर,अजय मयेकर,विजय मयेकर,प्रल्हाद वायंगणकर,रुपेश गरुड,सुभाष म्हसकर आदी उपस्थित होते.












