आशिये येथील लक्ष्मी गुरव यांचे निधन

कणकवली (प्रतिनिधी) : आशिये वरचीवाडी येथील लक्ष्मी आत्माराम गुरव ( वय 100 वर्षे) यांचे वृध्दापकाळाने कणकवली येथील खाजगी रुग्णालयात सायंकाळी 5.30वाजता उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. आशिये गावात शंभरी पार करणाऱ्या त्या जुन्या जाणत्या आजी म्हणून ओळखल्या जात होत्या. जुन्या चालीरिती परंपरा याबाबत आजही त्या मार्गदर्शन नव्या पीढीला करत होत्या. त्यांचे निधन झाल्याचे समजताच सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या मृतदेहावर सोमवारी सकाळी 10 वाजता येथील स्मशान भूमीत अत्यंसंस्कार करण्यात येत आहे. त्यांच्या पश्चात 2 मुलगे, 3 सुना, नातवंडे, पतवंडे असा परिवार आहे. त्या आशिये गावचे सरपंच महेश गुरव यांच्या आजी होत.

error: Content is protected !!