रत्नागिरीतील राज ठाकरेंच्या सभेस कोल्हापूरातून 10 हजार मनसैनिक जाणार

कोल्हापूर (रोहन भिऊंगडे) : राज ठाकरे यांच्या रत्नागिरी येथे होणाऱ्या सभेसंदर्भात नियोजन करण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक प्रदेश नेते, सरचिटणीस, प्रवक्ते संपर्क अध्यक्ष यांच्या उपस्थितीत शासकीय विश्रामगृह येथे पार पडली. कोकणामध्ये 6 मे रोजी होणाऱ्या राज साहेबांच्या सभेसाठी कोल्हापूरच्या महाराष्ट्र सैनिकांमध्ये प्रचंड उत्साह सळसळत असल्याने संपर्क अध्यक्ष जयराज दादा लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली मनसे नेते राजेंद्र वागसकर, मनसे प्रदेश सरचिटणीस ॲड. गणेश सातपुते, मनसे प्रवक्ते योगेश खैरे, महेश महाले उपाध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र रोजगार स्वयंरोजगार विभाग यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शासकीय विश्रामगृह येथे पार पडलेल्या बैठकीमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातून सुमारे 10 हजार कार्यकर्ते राज ठाकरे यांच्या सभेला जाण्याचा निर्धार मनसैनिकांनी व्यक्त केला.

मनसे कोल्हापूर पदाधिकारी बैठकीमध्ये शहर जिल्हाध्यक्ष राजू दिंडोले यांनी प्रस्तावना करताना वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार राज साहेबांच्या सभेला प्रचंड संख्येने कोल्हापूर जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते येथील असा विश्वास व्यक्त केला. जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले व गजानन जाधव यांनी आपापल्या विभागातून पदाधिकारी कार्यकर्ते बैठका घेऊन वातावरण निर्मिती करून जल्लोषात रत्नागिरीच्या सभेस जाण्याचा निर्धार व्यक्त केला. जिल्हा सचिव प्रसाद पाटील यांनी बैठकीमध्ये राजसाहेबांच्या सभेला जाण्यासाठी कोल्हापूरच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या मध्ये प्रचंड उत्साह असून जोश पूर्ण वातावरणात सभा यशस्वी करण्याचे आवाहन केले.

या बैठकीस निलेश धुम्मा, विजय करजगार, यतीन होरणे , दिलीप पाटील, राजू पाटील , अभिजीत राऊत, अजिंक्य शिंदे, भगवंत जांभळे, धनाजी आगलावे , संतोष चव्हाण, शिवा मठपती, चंदन सुगते , निलेश आजगावकर , सुनील तुपे, राजन हुल्लोळी, अमित पाटील, नवनाथ निकम, विक्रम नरके , रोहन निर्मळ आधी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!