गडनदी पुलावरील एलईडी स्वागत कमान ठरणार लक्षवेधी

कणकवली नगरपंचायतच्या माध्यमातून आणि नगराध्यक्ष नलावडे यांच्या संकल्पनेतून साकारली कमान

जानवली पुलावरही लवकरच स्वागत कमान उभारण्यात येणार

कणकवली (प्रतिनिधी) : राज्यात विविध उपक्रमांतर्गत व कर वसुलीमध्ये प्रथम क्रमांक प्राप्त केलेली कणकवली नगरपंचायत विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत आहे. शहरात विविध उपक्रम व विकास कामे मार्गी लावत असताना नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या नेतृत्वाखाली कणकवली नगरपंचायतकडून अनेक योजना देखील राबवल्या जात आहेत. त्यात कणकवली शहराच्या प्रवेशद्वार असलेल्या गडनदी पुलावर कणकवली नगरपंचायत आपले सहर्ष स्वागत करत आहे. ‘स्वच्छ कणकवली, सुंदर कणकवली’ या टॅग लाईन खाली एलईडी स्वागत कमान आजपासून कार्यान्वित करण्यात आली. गडनदी पुलावरच श्रीधर नाईक उद्यानाजवळ कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे व उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांच्या संकल्पनेतून कणकवली शहरात येणाऱ्या महामार्गावर प्रत्येक प्रवाशाचे स्वागत व्हावे या उद्देशाने ही एलईडी स्वागत कमान तयार करण्यात आली आहे. जेणेकरून कणकवली शहरात प्रवेश करत असताना कणकवलीची एक वेगळी ओळख निर्माण व्हावी या उद्देशाने गडनदी पुलावर ही एलईडी लाईटची स्वागत कमान लावण्यात आली आहे. येत्या काळात जानवली नदीवर देखील अशा प्रकारे कमान उभारण्यात येणार असून, लवकरच या कमानीचे लोकार्पण करण्यात येणार असल्याची माहिती नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली. गेल्या अनेक वर्षांच्या या मागणीला अखेर मूर्त स्वरूप आल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!