संशयित आरोपीच्या वतीने ऍड. मिलिंद सावंत यांचा युक्तिवाद
कणकवली (प्रतिनिधी): जेवणाच्या रागातून दयानंद मेस्त्री (50), वागदे) याने पत्नी व मुलांना शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्या बाबत दयानंद मेस्त्री याच्यावर कणकवली पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी दयामेस्त्री याला अटक करून न्यायालयात हजर केले असता त्याची पंधरा हजाराच्या सश्यर्थ जामिनावर मुक्तता करण्यात आली. संशयीत आरोपीच्या वतीने ऍड. मिलिंद सावंत यांनी काम पाहिले. याबाबत पोलिसात दयानंद मेस्त्री याच्या पत्नी शितल दयानंद मेस्त्री यांनी फिर्याद दिली आहे. या फिर्यादीत त्यांनी म्हटले आहे. सोमवारी रात्री दयानंद मेरुली यांनी जेवणाच्या कारणावरून फिर्यादी पत्नी व मुलांना शिवीगाळ करत धमकी देऊन तुम्हाला संपवून टाकतो असे म्हटले. याबाबत पोलिसांनी संशयित आरोपीला अटक करून न्यायालयात हजर केले असता त्याची सार्थ जामीनावर मुक्तता करण्यात आली. यामध्ये पोलीस तपासात ढवळाढवळ न करणे, साक्षीदारांवर दबाव न आणणे, पोलीस तपासाला सहकार्य करणे अशा अटी घालण्यात आल्या आहेत.