डिस्ट्रिक्ट गव्हर्नर व्यंकटेश देशपांडे व माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या हस्ते झाले लोकार्पण
लोकार्पण सोहळ्याला रोटरीचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित
कणकवली (प्रतिनिधी) : रोटरी क्लब ऑफ कणकवली सेंट्रलचा आदर्श विहीर प्रकल्प अंतर्गत कसवण- सावंतवाडी ग्रामस्थांसाठी २ लाख रुपयांची विहीर बांधून देण्यात आली. या विहिरीचा लोकार्पण सोहळा डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रो. व्यंकटेश देशपांडे व मा. नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या हस्ते पार पडला.
याप्रसंगी माजी नगरसेवक अजय गांगण, रोटरीयन अशोक नाईक, असिस्टंट गव्हर्नर दीपक बेलवलकर, नीता गोवेकर, अध्यक्ष वर्षा बांदेकर, सेक्रेटरी उमा परब, खजिनदार माधवी मुरकर, नितीन बांदेकर, रवी परब, महेंद्रकुमार मुरकर, स्नेहलता राणे, संतोष कांबळे, तृप्ती कांबळे, स्मिता पावसकर, गुरुनाथ पावसकर, डॉ. विद्याधर तायशेटे, डॉ. सुहास पावसकर, मोहिनी राठोड, भैराराम राठोड, प्रमोद लिमये, जीवन रेगे, धनंजय कसवणकर, लवू पिळणकर, कुडाळ रोटरी क्लब सदस्य शशिकांत चव्हाण, राजन बोभाटे, वैभववाडी रो. क्लब सदस्य संतोष टक्के, संजय रावराणे, वेंगुर्ला रो. क्लब सदस्य राजेश घाटवळ, जमीन मालक माजी सरपंच संजय सावंत, नारायण नरसाळे आदी ग्रामस्थ उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश कदम यांनी केले. विहीर बांधून दिल्याबद्दल कसवण- सावंतवाडी ग्रामस्थांनी रोटरी क्लबचे आभार मानले.