आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

गणरायाच्या उत्सवात माणुसकीचा ‘शिधा’

दिव्यांग बांधवांच्या आनंदात विशाल परब सहभागी वेंगुर्ला (प्रतिनिधी) : गणेशोत्सव म्हणजे आनंद, उत्साह आणि सामाजिक बांधिलकीचा सण. या आनंदापासून समाजातील कोणताही घटक वंचित राहू नये, या भावनेतून भाजप युवा नेते विशाल परब यांच्या पुढाकारातून दिव्यांग बांधवांसाठी शिधा वाटपाचा सामाजिक उपक्रम…

शिवडाव माध्यमिक विद्यालय शिवडाव व सावंत फाऊंडेशन कळसुली आयोजित मुर्ती स्पर्धा उत्साहात संपन्न

कणकवली (प्रतिनिधी) : शिवडाव माध्यमिक विद्यालय शिवडाव या प्रशालेत कै. महादेव सिताराम सावंत ( उर्फ आप्पा डोंगरे ) स्मृतीप्रित्यर्थ सावंत फाऊंडेशन , कळसुली यांच्या वतीने आयोजित मुर्ती बनविण्याची स्पर्धा मोठया उत्साहात दि. 08 सप्टेंबर,2026 रोजी संपन्न झाली, सावंत फाऊंडेशनचे श्रीकृष्ण…

बुवा समीर कदम कुटुंबीयांचे माजी आ. वैभव नाईकांकडून सांत्वन

कुडाळ (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील पोखरण‌ गावचे सुप्रसिद्ध भजनी बुवा समीर कदम यांचे दुःखद निधन झाल्याने माजी आमदार वैभव नाईक यांनी कदम कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांच्या दुःखात सहभागी होऊन त्यांचे सांत्वन केले.

कणकवलीत छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे वराह जयंती उत्साहात साजरी

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली येथे विविध हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे एकत्र येत वराह पूजनाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला. हिंदुत्ववादी कार्यकर्ते नंदू आरोलकर आणि भाजप तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री यांनी भगवान वराह यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून प्रतिमेस…

गणेशोत्सवानिमित्त ‘कोकण गोरत्न फाऊंडेशन’च्या टी-शर्टचे अनावरण

बांदा (प्रतिनिधी) : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकण गोरत्न फाऊंडेशनतर्फे गणेशोत्सवासाठी तयार करण्यात आलेल्या विशेष टी-शर्टचे अनावरण उत्साहात करण्यात आले. यावेळी बांदा गडगेवाडी येथील स्त्री शक्ती महिला भजन मंडळ तसेच अनिरुद्ध उपासना केंद्र, बांदा यांना भजन साहित्य देखील प्रदान करण्यात आले. गणेशोत्सव…

ओबीसी बांधवांच्या हक्कासाठी सातत्याने पाठपुरावा करणाऱ्या आमदार प्रमोद जठार यांचा कासार्डे येथे नागरी सत्कार

वैश्यवाणी समाजाला OBC प्रमाणपत्राचा मार्ग सुकर झाल्याबद्दल कृतज्ञता; समाजबांधवांचा उत्स्फूर्त सहभाग कासार्डे (प्रतिनिधी) : वैश्यवाणी समाजातील पात्र घटकांना OBC प्रवर्गाचे जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र मिळण्याचा मार्ग सुकर करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करणारे आमदार प्रमोद जठार यांचा OBC बांधवांच्या वतीने…

पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी वैभववाडी नगरपंचायतीची ‘इकोफ्रेंडली गणपती’ रील्स स्पर्धा

वैभववाडी (प्रतिनिधी) : पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी वाभवे-वैभववाडी नगरपंचायतीतर्फे यंदा ‘इकोफ्रेंडली गणपती व सजावट रील्स स्पर्धे’चे आयोजन करण्यात आले आहे. गणेशोत्सवातील पर्यावरणपूरक उपक्रम, गणेशमूर्ती, सजावट, आरती व भक्तिभाव यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यापक व्यासपीठ मिळावे, हा या स्पर्धेचा उद्देश आहे.…

शेठ न. म. विद्यालय व ज्युनिअर कॉलेज खारेपाटण येथे वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात संपन्न

खारेपाटण (प्रतिनिधी) : “यश हे केवळ गुणांचे नसते, तर ते मेहनत, जिद्द आणि सातत्याचे फलित असते,” या भावनेचा प्रत्यय देत शेठ न. म. विद्यालय, व ज्युनिअर कॉलेज खारेपाटण येथे शालेय वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ मोठ्या उत्साहात आणि आनंदमय वातावरणात नुकताच…

“सिंधुदुर्गचा ‘उडता पंजाब’ होऊ देऊ नका; अमली पदार्थांच्या मुद्द्यावर सर्वपक्षियांनी एकत्र येऊन लढा द्यावा”

आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष विवेक ताम्हणकर यांचे आवाहन सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यात अलीकडेच शिरोडा येथे गांजा आणि ड्रग्ज हे अमली पदार्थ जप्त करत जिल्हा पोलिसांनी अत्यंत धाडसी कारवाई केली आहे. मात्र आता सिंधुदुर्ग जिल्ह्याचा उडता पंजाब होण्यापासून वाचवण्यापेक्षा या…

मंत्री नितेश राणे यांच्या पुढाकारातून दुसरी ‘मोदी एक्सप्रेस’ कोकणच्या दिशेने रवाना

कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांनी दाखवला झेंडा मुंबई (प्रतिनिधी) : गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास सुखकर व्हावा, यासाठी कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांच्या पुढाकारातून आज दुसरी ‘मोदी एक्सप्रेस’ गणेशभक्तांना घेऊन कोकणच्या दिशेने रवाना झाली. दादर रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक १४…

error: Content is protected !!