मडूरा येथे युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

बांदा (मंगल कामत) : मडूरा – देऊळवाडी येथील बाळकृष्ण दत्ताराम मेस्त्री (वय ३१) या युवकाने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. शुक्रवारी दुपारी घरात कोणीही नसल्याची संधी साधून त्याने किचन रूम मध्ये गळफास घेतला. स्थानिकांनी त्याला दुपारी बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेले. मात्र, वैद्यकीय अधिकारी डॉ. गजानन सारंग यांनी त्याला मृत घोषित केले.

डॉ. सारंग यांनी मृतदेहाचे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. रात्री उशिरा त्याच्या मृतदेहावर मडूरा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्चात आई, वडील, दोन बहिणी असा परिवार आहे.

error: Content is protected !!