आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

मुंबई-गोवा महामार्गावर तीन वाहनांचा अपघात; सुदैवाने जीवितहानी टळली

बांदा (प्रतिनिधी) : मुंबई-गोवा महामार्गावर बांदा सटमटवाडी येथे आज दुपारी सुमारे अडीच वाजण्याच्या सुमारास तीन वाहनांचा अपघात झाला. भरधाव वेगात जाणाऱ्या मोटारीचा समोरील दुचाकी व मोटारीला धडक बसल्याने ही दुर्घटना घडली. या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र दोन…

विशाल परब यांच्याकडून किडनी आजारग्रस्ताला तातडीची आर्थिक मदत

दोडामार्ग (प्रतिनिधी) : किडनीच्या आजाराने त्रस्त असलेल्या झोळंबे येथील सुरेश गवस यांना भाजपचे युवा नेते विशाल परब यांनी आर्थिक मदत दिली आहे. श्री. गवस हे गेले अनेक दिवस किडनीच्या आजाराने त्रस्त आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी…

फोंडाघाट महाविद्यालयाच्या सारिका येंडे हिचे सुवर्णयश !

मुंबई विद्यापीठ आंतरमहाविद्यालयीन ॲथलेटिक्स स्पर्धेत थाळीफेक प्रकारात सुवर्णपदक ! फोंडाघाट (प्रतिनिधी) : मुंबई विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन ॲथलेटिक्स स्पर्धा डेरवण (ता. चिपळूण, जि. रत्नागिरी) येथे नुकत्याच पार पडल्या या स्पर्धेत फोंडाघाट महाविद्यालयातील सारिका गुरुनाथ येंडे हिने थाळीफेक या क्रीडा प्रकारात अत्यंत उल्लेखनीय…

शशिकांत तांबे यांना बेस्ट टिचर पुरस्कार जाहीर

कणकवली (प्रतिनिधी) : मुंबई शिक्षक साहित्य मंडळ, मुंबई आयोजित यावर्षीच्या “बेस्ट टिचर पुरस्कार ‘व “राज्यस्तरीय निबंध लेखन स्पर्धेतील सन्मान “सिंधुदुर्ग जिल्ह्यातील साहित्यिक शिक्षक शशिकांत तांबे यांना जाहीर झाला आहे. २२ नोव्हेंबर २०२५ रोजी रविंद्र नाट्ममंदिर प्रभादेवी, मुंबई येथे देशाचे गृहमंत्री…

सामाजिक कार्यकर्ते शांताराम ऊर्फ बाळा गोसावी यांचे निधन

चौके ( प्रतिनिधी ) : मसुरे मेढा वाडी गावचे सुपुत्र, अखिल भारतीय कॅरम फेडरेशनचे माजी उपाध्यक्ष, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते शांताराम उर्फ बाळा नारायण गोसावी (60) यांचे शनिवार दिनांक 1 नोव्हेंबर रोजी रात्री उशिरा मालवण येथे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने आकस्मित निधन…

फुलविक्रेत्या वृद्धाची आत्महत्या

मालवण (प्रतिनिधी) : शहरातील बाजारपेठेत चाफ्याची फुले विक्री करणारे फुलविक्रेते चंद्रकांत वसंत फोंडेकर (वय ६५, रा. भरडेवाडी, कुंभारमाठ) यांनी स्वतःच्या अंगणातील चाफ्याच्याच झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकलेले नाही. मालवण…

रतांब्याच्या व्हाळावरील हायवे पुलाची दुर्दशा ! जनतेच्या तोंडाला पाणी पुसण्याचा प्रयत्न

फोंडाघाट (प्रतिनिधी) : मुंबई- गोवा हायवे रस्त्यावर, कणकवली तालुक्यातील जानवली दरम्यान रतांब्याचा व्हाळ येथे पुलाची बांधणी न करताच जुन्या पुलाची डागडुजी व रंगकाम करून ठेकेदाराने काम पूर्ण करून बिल केल्याचे आता उघड होत आहे. वस्तुतः हायवे रस्त्यातील येणारे पूल नवीन…

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेनुसार पारदर्शक कर्मचारी भरती प्रक्रिया राबवा

राज्य सरकारचे जिल्हा बँकांना आदेश जिल्हा बँकेच्या पारदर्शक कर्मचारी भरती प्रक्रियेची राज्य शासनाकडून दखल सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पारदर्शक व स्थानिक उमेदवार भरती प्रक्रियेत प्रमुख स्थान देण्याबाबत च्या जिल्हा बँकेच्या निर्णयाची दखल राज्य शासनाने घेतली असून…

आम्हीच खरे गोरक्षक ! दूध उत्पादक शेतकऱ्यांचा दावा !

शेतकऱ्यांकडून दुधाळ जनावरे वाहतुकीसाठी दूध संस्थांचा दाखला ग्राह्य धरावा अशी आग्रही मागणी ! फोंडाघाट (प्रतिनिधी) : दुधाळ जनावरे वाहतूक करण्यासाठी यापूर्वी स्थानिक दूध उत्पादक शेतकरी संस्थेचा दाखला ग्राह्य धरला जात होता. मात्र तो आता चालणार नाही, असे पोलीस चेक पोस्टवर…

खारेपाटण पंचायत समिती मतदार संघातून भाजप युवा कार्यकर्ते निखिल कृष्ण गुरव इच्छुक

खारेपाटण (प्रतिनिधी) : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका आरक्षण जाहीर झाल्यानंतर प्रत्येक मतदार संघात इच्छुक उमेदवारांची नावे आता हळूहळू पुढे येऊ लागली असून खारेपाटण पंचायत समिती मतदार संघातून भारतीय जनता पार्टी पक्षाकडून खारेपाटण संभाजी नगर येथील पक्षाचे युवा कार्यकर्ते…

error: Content is protected !!