न्यू इंग्लिश स्कूल ॲण्ड ज्युनि. कॉलेज फोंडाघाट मध्ये ए. आय. प्रशिक्षण वर्ग संपन्न

फोंडाघाट (प्रतिनिधी) : फोंडाघाट एज्युकेशन सोसायटी संचलित न्यू इंग्लिश स्कूल ॲण्ड ज्युनिअर कॉलेज फोंडाघाट मध्ये एम. के. सी. एल. मार्फत शिक्षकांसाठी शिक्षणामध्ये ए. आय. तंत्रज्ञानाचा वापरासंबंधी प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रशिक्षण वर्गास प्रशालेचे मुख्याध्यापक प्रसाद पारकर, पर्यवेक्षक श्री. राठोड, जुनि. कॉलेज व्यवस्थापक श्री. फड, ज्येष्ठ शिक्षिका सौ. रेवडेकर, सर्व शिक्षकवृंद तसेच एम. के. सी. एल. चे प्रशिक्षक गणेश इस्वलकर, प्रशांत वंजुळे व पृथ्वीराज चव्हाण उपस्थित होते.

प्रशिक्षण वर्गाची सुरुवात मान्यवरांच्या शुभहस्ते दीप प्रज्वलन आणि सरस्वती पूजनाने झाली. त्यानंतर मुख्याध्यापक प्रसाद पारकर यांनी प्रशिक्षकांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करुन आजच्या आधुनिक शिक्षण प्रणालीत शिक्षकांनी ए. आय. तंत्रज्ञानाचे ज्ञान अवगत करून त्याचा योग्यप्रकारे वापर अत्यावश्यक असल्याचे विचार त्यांनी आपल्या प्रास्ताविकात व्यक्त केले. त्यानंतर प्रशिक्षक गणेश इस्वलकर ए. आय. तंत्रज्ञानातील विविध ॲपविषयी सविस्तर माहिती दिली. तर प्रशिक्षक प्रशांत वंजुळे व पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रात्यक्षिकांसह प्रोजेक्टरच्या सहाय्याने शिक्षणामध्ये विविध ए. आय. ॲप्सचा वापर कशाप्रकारे करता येईल याची माहिती दिली.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. जोईल यांनी केले. सर्व उपस्थित मान्यवर व शिक्षक यांचे आभार श्री. फड यांनी म्हणून या प्रशिक्षण वर्गाचा समारोप केला.

error: Content is protected !!