‘पाककला सर्धेत’ कु. तेजश्री शेंगाळे महाविद्यालयात प्रथम
खारेपाटण (प्रतिनिधी) : कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, खारेपाटण येथे महिला विभाग कक्ष व मराठी विभाग तसेच सांस्कृतिक विभागाच्या वतीने नुकतेच विविध डे साजरे करण्यात आले. यावेळी Cultural Days अंतर्गत घेण्यात आलेली पाककला स्पर्धेत महाविद्यालयाची वाणिज्य विभागाची विद्यार्थीनी कु. तेजश्री सुहास शेंगाळे हिने प्रथम क्रमांक प्राप्त केला.
खारेपाटण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए डी कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या पालकाला स्पर्धेत महाविद्यालयातील तिन्ही शाखांतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून आपल्या पाककलेतील कौशल्य, कल्पकता व सादरीकरणातून उपस्थितांची मने जिंकली. पारंपरिक तसेच नाविन्यपूर्ण पदार्थांच्या सादरीकरणामुळे स्पर्धेला विशेष रंगत आली. तर या सर्धेत खालील विद्यार्थ्यांनी यश मिळविले. प्रथम – तेजश्री सुहास शेंगाळे (वाणिज्य विभाग), द्वितीय– हलिमा इरफान सारंग (विज्ञान विभाग), तृतीय – सलोनी लक्ष्मण जाधव (विज्ञान विभाग) तरउत्तेजनार्थ – हर्षदा सातापा बामणेकर (कला विभाग) या सर्व विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.

खारेपाटण येथील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या विविध ट्रॅडिशनल डे बरोबरच विद्यार्थ्यांनीच्या “सारी डे “ ने सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले होते. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. रश्मी देसाई यांनी तर आभारप्रदर्शन प्रा.माधवी पांचाळ मॅडम यांनी केले. तर पाककला स्पर्धेचे परीक्षण प्रा.डॉ. वंदना शिंदे (कला विभाग), प्रा. नमिरा मुजावर (वाणिज्य विभाग) व प्रा. प्रज्योत नलावडे (विज्ञान विभाग) यांनी केले. या स्पर्धेसाठी महाविद्यालयातील सर्व शाखांतील सर्व विद्यार्थी व प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या सहभागामुळे व प्राध्यापकांच्या मार्गदर्शनामुळे पाककला स्पर्धा अत्यंत यशस्वी व उत्साही वातावरणात पार पडली.










