कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली–बांधकरवाडी येथील सरस्वती गणेश राणे (वय ८८) यांचे मंगळवारी वृद्धापकाळाने त्यांच्या राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या निधनाने बांधकरवाडी परिसरात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
सरस्वती राणे या प्रेमळ, मृदुभाषी व परोपकारी स्वभावासाठी परिसरात परिचित होत्या. सामाजिक व कौटुंबिक जीवनात त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. त्या बुवा सुनील राणे यांच्या मातोश्री होत.
त्यांच्या पश्चात पती, चार मुलगे, एक मुलगी, तीन सुना, एक जावई, पाच नातू व दोन नाती असा मोठा परिवार आहे.










