आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

जिल्हा बँक भरती परिक्षेसाठी विनामूल्य प्रशिक्षण मार्गदर्शन शिबिराचे आयोजन

भरती प्रक्रिया होणार पारदर्शक ; अफवांवर विश्वास ठेवू नका ओराेस (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने भरतीसाठी रजिस्टर केलेल्या उमेदवारांसाठी बँकेतर्फे विनामूल्य प्रशिक्षण व मार्गदर्शन शिबिर आयोजित केली आहेत. सदर प्रशिक्षणासाठी आपले नाव नोंदवण्यासाठी बँक गुगल फॉर्म लिंक प्रसिद्ध…

पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते ‘व्यसनमुक्त गड- किल्ले संवर्धन मोहिमेचा’ सिंधुदुर्गातून शुभारंभ!

११ ऑक्टोबरला रेडी येथील यशवंतगडावर पालकमंत्री, जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांच्या उपस्थितीत उपक्रमाची होणार सुरुवात सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ऐतिहासिक गड-किल्ल्यांचे व्यसनमुक्ती संवर्धन करण्याच्या मोहिमेचा शुभारंभ ११ ऑक्टोबर, २०२५ रोजी सकाळी १० वाजता वेंगुर्ले तालुक्यातील यशवंतगड, रेडी येथे होणार आहे.…

छ.शिवाजी महाराज महाराजस्व अभियाअंतर्गत खारेपाटण केंद्र शाळेत विद्यार्थ्यांना वय अधिवास व जातीच्या दाखल्यांचे वितरण

पहिल्या टप्प्यात सुमारे ६९ विद्यार्थ्यांना देण्यात आले दाखले खारेपाटण (प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासनाच्या छ.शिवाजी महाराज महाराजस्व अभियाना अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी यांचे आदेशान्वये नावीन्यपूर्ण उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील शालेय विद्यार्थ्यांना शालेय प्रवेश व इतर शासकीय लाभांसाठी आवश्यक असणारे वय अधिवास व जातीचे…

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था फोंडाघाट येथे रोजगाराभिमुख नवीन अल्प कालावधी अभ्यासक्रमाचा शुभारंभ

फोंडाघाट (प्रतिनिधी) : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था फोंडाघाट येथे आधुनिक काळाच्या गरजेनुसार आणि युवकांना स्वयंरोजगार कडे प्रवृत्त करण्यासाठी विविध नवीन अल्प कालावधी अभ्यासक्रमाचा शुभारंभ होत आहे. हा ऐतिहासिक उपक्रम येत्या ८ ऑक्टोंबर २०२५ रोजी देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांच्या…

कणकवली नगरपंचायत नगरसेवकपदाची आरक्षण सोडत 8 ऑक्टोबर रोजी

कणकवली (प्रतिनिधी) : नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2025 करिता आरक्षण सोडत 8 ऑक्टोबर रोजी 11 वाजता नगरपंचायत सभागृह कणकवली च्या दुसऱ्या मजल्यावर होणार आहे. यावेळी उपस्थित राहण्याचे आवाहन कणकवलीच्या मुख्याधिकारी गौरी पाटील यांनी केले आहे.

मळेवाड येथे 19 ऑक्टोबर रोजी आकाश कंदील व नरकासुर स्पर्धेचे आयोजन

सावंतवाडी (प्रतिनिधी) : दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ग्रामपंचायत मळेवाड कोंडुरे व युवा मित्र मंडळ मळेवाड कोंडुरे यांच्याकडून मळेवाड जकातनाका येथे गाव मर्यादित आकाश कंदील स्पर्धा तसेच आमंत्रित नरकासुर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. आकाश कंदील स्पर्धा ही पर्यावरण पूरक असणार आहे…

पंचायत समिती सभापती आरक्षण जाहीर

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आठ पंचायत समित्यांच्या सभापती पदांचे आरक्षण मंगळवारी जिल्हाधिकारी श्रीमती तृप्ती धोडमिसे यांच्या उपस्थितीत झाले. कुडाळ, देवगड वैभववाडी या तालुक्यांचे सभापतीपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुले झाले. सावंतवाडी सभापती पदअनुसूचित जाती महिला साठी, वेंगुर्ला पंचायत समिती सभापतीपद नागरिकांचा…

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियाना अंतर्गत शेर्पे गावात करण्यात आली स्वच्छता

खारेपाटण (प्रतिनिधी) : मुख्यमंत्री समृद्ध गाव पंचायतराज अभियाना अंतर्गत कणकवली तालुक्यातील शेर्पे या गावात ग्रामपंचायतीच्या वतीने व ग्रामस्थांच्या सहकार्याने गावातील सार्वजनिक ठिकाणे व पायवाटा रस्ते यांची साफ सफाई व स्वच्छता गावच्या सरपंच स्मिता पांचाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकतीच करण्यात आली.…

धामापूर येथील ज्येष्ठ नागरिक विदुर प्रभू यांचेवर हृदयविकाराची मोफत शास्त्रक्रिया

भाजप कार्यकर्ते नामदेव चव्हाण यांनी केले विशेष प्रयत्न खारेपाटण (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील धामापूर या गावातील आर्थिक दुर्बल घटकातील वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिक विदुर प्रभू वय ७५ वर्षे हे हृदयविकाराच्या गंभीर आजाराने त्रस्त होते. ही बाब सामाजिक कार्यकर्ते व भाजप पक्षाचे…

कलमठ गावातील शासकीय कर्मचाऱ्यांना ‘एआय’ प्रशिक्षण

आशा सेविका, अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी घेतल ‘एआय’ कार्यपद्धती प्रशिक्षण कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा एआय दिशेने वाटचाल करत असताना कणकवली तालुक्यातील कलमठ ग्रामपंचायतच्या वतीने गावातील विविध शासकीय कर्मचाऱ्यांना एआय प्रशिक्षण आयोजन केले होते. सिंधुदुर्ग जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागातील ग्रामपंचायत…

error: Content is protected !!