फोंडाघाट (प्रतिनिधी) : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था फोंडाघाट येथे आधुनिक काळाच्या गरजेनुसार आणि युवकांना स्वयंरोजगार कडे प्रवृत्त करण्यासाठी विविध नवीन अल्प कालावधी अभ्यासक्रमाचा शुभारंभ होत आहे. हा ऐतिहासिक उपक्रम येत्या ८ ऑक्टोंबर २०२५ रोजी देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते महाराष्टातील सर्व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था व तांत्रिक विद्यालयांमध्ये आभासी पद्धतीने पार पडणार आहे.
हा उपक्रम ग्रामीण आणि शहरी युवकांना रोजगारक्षम बनविण्याच्या दिशेने मोठे पाऊल आहे प्रशिक्षण घेऊन युवक स्वतःचा व्यवसाय उभारू शकतात म्हणून सर्व इच्छुक युवक युवतींनी या संधीचा अवश्य लाभ घ्यावा. ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेला भेट संस्थेमध्ये सुरू असून प्रवेश शुल्क केवळ १०० रुपये ठेवण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना तांत्रिक कौशल्य कौशल्य सोबतच प्रत्यक्ष प्रात्यक्षिक द्वारे प्रशिक्षण दिले जाणार आहे.
औद्योगिक प्रशिक्षण संस्था फोंडाघाट येथे खालील प्रमाणे अभ्यासक्रम सुरु करण्यात येत आहेत.
१) सर्टिफिकेट कोर्स इन इम्ब्रोयडरी वर्क
२) सर्टिफिकेट कोर्स इन टू व्हीलर सर्व्हिस असिस्टंट
३) सर्टिफिकेट कोर्स इन ड्राफ्ट पर्सन – सिव्हिल वर्क
४) सर्टिफिकेट कोर्स इन प्लंबर जनरल
५) सर्टिफिकेट कोर्स इन आय टी हेल्प डेस्क अटेंडंट
या सर्व अभ्यासक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना रोजगार भिमुख प्रशिक्षण दिले जाणार असून स्थानिक युवकांना औद्योगिक आणि सेवा क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत तरी जास्तीत जास्त युवक युवतींनी या संधीचा लाभ घ्यावा. दिनांक ८ ऑक्टोंबर २०२५ रोजी दुपारी ३:३० वाजता माननीय पंतप्रधान यांच्या हस्ते अल्पमुद्दिनचे अभ्यासक्रमाचे आभार्थी पद्धतीने घेणाऱ्या उद्घाटनाचे थेट प्रक्षेपण शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था फोंडाघाट येथे करण्यात आले आहे. तरी या सोहळ्यास परिसरातील नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थिती राहण्याचे आवाहन संस्थेचे प्राचार्य भूषण सोनवणे यांनी केले आहे.












