भरती प्रक्रिया होणार पारदर्शक ; अफवांवर विश्वास ठेवू नका
ओराेस (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने भरतीसाठी रजिस्टर केलेल्या उमेदवारांसाठी बँकेतर्फे विनामूल्य प्रशिक्षण व मार्गदर्शन शिबिर आयोजित केली आहेत. सदर प्रशिक्षणासाठी आपले नाव नोंदवण्यासाठी बँक गुगल फॉर्म लिंक प्रसिद्ध करीत आहे. बँकेच्या या परीक्षेसाठी आयोजित मार्गदर्शन वर्गाचा जास्तीत जास्त उमेदवारांनी लाभ करून घ्यावा व सदर भरती प्रक्रिया पारदर्शकपणे पार पडणार असल्याने इतर कुठल्याही भरती संबंधित अफवांना बळी न पडता अभ्यासावर लक्ष केंद्रित करून परीक्षा चांगल्या मार्काने पास करावी व मेरिटमध्ये यावे असे आवाहन बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी केले आहे. सदर प्रशिक्षण शिबिर हे पुढच्या आठवड्यापासून सिंधुदुर्ग नगरी येथे सुरू होणार आहे.












