आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

चिंदर नागोचीवाडी येथे रस्ता डांबरीकरणाचा शुभारंभ…!

आचरा (प्रतिनिधी) : चिंदर नागोचीवाडी येथील जन सुविधे मधून मंजूर झालेल्या उभादेव ते दादा पडवळ घर रस्त्याच्या डांबरीकरणाचा शुभारंभ आज जेष्ठ नागरिक मालिनी मयेकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी उपसरपंच दिपक सुर्वे, रविंद्र पडवळ, दया देसाई, तुळशीबाई पडवळ, परेश मांजरेकर,…

श्री देव गांगो – रवळनाथ मंडळ शिडवणे आयोजित

भव्य राज्यस्तरीय बैलगाडा शर्यत स्पर्धेचा शानदार शुभारंभ शिडवणे गावात प्रथमच राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय बैलगाडा शर्यत स्पर्धेचे आयोजन असल्याने नागरिकांची तुफान गर्दी खारेपाटण (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील शिडवणे या गावी प्रथमच येथील श्री देव गांगो – रवळनाथ मंडळ शिडवणे यांच्यावतीने मंगळवार…

मच्छिमार संस्थांना समन्यायी पद्धतीने तलावांच्या वाटपाचे धोरण राबवा – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

मत्स्योत्पादनात वाढ करणे व पादर्शकता आणणे ही शासनाची भूमिका – मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे मुंबई (प्रतिनिधी) : राज्यातील सर्व मच्छिमार संस्थांना समन्यायी पद्धतीने तलावांचे वाटप होण्याच्या दृष्टीने आणि तलावांचे वाटप होताना संस्थांच्या सभासद संख्येनुसार तलाव क्षेत्र ठरवणारे धोरण तयार करावे…

गोळवन सरपंचांनी मुसलमान व्यक्ती बनावट घर पत्रक उतारा केला प्रदान…

सजित चेंदवणकर यांचा आरोप : तहसीलदार, गटविकास अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार करत कारवाईची मागणी… मालवण (प्रतिनिधी) : तालुक्यातील गोळवण धवडकीवाडी येथील रघुनाथ चेंदवणकर यांच्या घराचा बनावट घरपत्रक उतारा बनविण्यात आला आहे. विद्यमान सरपंच सुभाष लाड यांनी बनावट घरपत्रक उतारा बांगलादेशी मुसलमान…

एल.ई.डी. मासेमारी प्रकरणी नौका जप्त

आचरा (प्रतिनिधी) : दि. २५ फेब्रुवारी रोजी पहाटेच्या सुमारास आचरा किनाऱ्याजवळील सागरी हद्दीत अनधिकृत एल.ई.डी. मासेमारी करणाऱ्या नौकेवर कारवाई करण्यात आली. मत्स्य व्यवसाय परवाना कक्ष, देवगडचे सहाय्यक मत्स्य विकास अधिकारी श्री. पार्थ तावडे व त्यांच्या पथकाने नियमित गस्त घालत असताना…

वरवडे श्री लिंगेश्वर मंदिरात महाशिवरात्री उत्सवाचे आयोजन

कणकवली (प्रतिनिधी) : तालुक्यातील वरवडे गावातील लिंगाची भाटी येथील श्री लिंगेश्वर मंदिरात महाशिवरात्री उत्सवाचे आयोजन श्री लिंगेश्वर ऐक्यवर्धक मंडळ परबवाडी यांच्या वतीने करण्यात आले आहे. सकाळी ९ वाजता अभिषेक, दुपारी १ वाजता महाआरती तिर्थप्रसाद, दुपारी २ वा. महाप्रसाद, दुपारी ३…

वंदना घाणेकर व विजय चौकेकर विशेष पुरस्काराने सन्मानित

बॅ नाथ पै सेवांगण कट्टाच्या वतीने सन्मान चौके (प्रतिनिधी) : बॅ नाथ पै सेवांगण शाखा कट्टाच्यावतीने शिवजयंती हा उत्सव विविध कार्यक्रमाद्वारे संपन्न झाला. यावेळी निरामय केंद्र कोलगावच्या सचिव वंदना घाणेकर याना बापूभाई शिरोडकर स्मृति आदर्श समाजसेविका पुरस्कार व विजय चौकेकर…

कट्टा पंचक्रोशी भंडारी समाजाच्यावतीने 28 फेब्रुवारी रोजी सर्वजातीय वधू-वर परिचय मेळावा

चौके (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील कट्टा पंचक्रोशी भंडारी समाज संघ, कट्टा ता. मालवण यांंच्यावतीने सर्वजातीय (OPEN, OBC, SBC, SC, ST, NT, VJ) प्रथम वर, प्रथम वधू, घटस्फोटीत, विधवा, विधुर, आंतरजातीय विवाह इच्छुक, पुनर्विवाह इच्छुक वधु – वर परिचय मेळावा शुक्रवार…

समाजभूषण रुपेश सावंत यांनी वृद्धाश्रमात वाढदिवस केला साजरा

समाजभान राखत जपली सामाजिक बांधिलकी कणकवली (प्रतिनिधी) : समाजभूषण पुरस्कारप्राप्त सामाजिक कार्यकर्ते खारेपाटण गावचे सुपुत्र तथा डोंबिवली येथील उद्योजक रुपेश सावंत यांनी आपला वाढदिवस असलदे येथील दिविजा वृद्धाश्रमात साजरा करत सामाजिक बांधिलकी जोपासली. रुपेश सावंत यांनी सोमवार २४ फेब्रुवारी रोजी…

पंचशील क्रिकेट क्लब खारेपाटण च्या वतीने दि.१ मार्च २०२५ रोजी

खारेपाटण येथे भव्य ओव्हर आर्म टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन खारेपाटण (प्रतिनिधी) : प्रतीवर्षा प्रमाणे याहीवर्षी पंचशील विकास मंडळ खारेपाटण आयोजित व पंचशील क्रिकेट क्लब खारेपाटण पुरस्कृत मर्यादित षटकांच्या भव्य टेनिस बॉल ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धेचे आयोजन दी.१ मार्च २०२५ ते…

error: Content is protected !!