वरवडे श्री लिंगेश्वर मंदिरात महाशिवरात्री उत्सवाचे आयोजन

कणकवली (प्रतिनिधी) : तालुक्यातील वरवडे गावातील लिंगाची भाटी येथील श्री लिंगेश्वर मंदिरात महाशिवरात्री उत्सवाचे आयोजन श्री लिंगेश्वर ऐक्यवर्धक मंडळ परबवाडी यांच्या वतीने करण्यात आले आहे. सकाळी ९ वाजता अभिषेक, दुपारी १ वाजता महाआरती तिर्थप्रसाद, दुपारी २ वा. महाप्रसाद, दुपारी ३ वा. सांस्कृतिक कार्यक्रम, सायंकाळी ६ वाजता नदीपात्रात दीपार्पण सोहळा, सायंकाळी ७ वाजता सुस्वर भजन अशी उत्सवाची रूपरेषा आहे. सर्व शिवभक्तांनी उपस्थित राहून तीर्थप्रसाद व महाप्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

error: Content is protected !!