समाजभूषण रुपेश सावंत यांनी वृद्धाश्रमात वाढदिवस केला साजरा

समाजभान राखत जपली सामाजिक बांधिलकी

कणकवली (प्रतिनिधी) : समाजभूषण पुरस्कारप्राप्त सामाजिक कार्यकर्ते खारेपाटण गावचे सुपुत्र तथा डोंबिवली येथील उद्योजक रुपेश सावंत यांनी आपला वाढदिवस असलदे येथील दिविजा वृद्धाश्रमात साजरा करत सामाजिक बांधिलकी जोपासली. रुपेश सावंत यांनी सोमवार २४ फेब्रुवारी रोजी आपल्या वाढदिवसानिमित्त कणकवली तालुक्यातील असलदे येथे दिविजा वृद्धाश्रमाला भेट दिली. दिविजा वृद्धाश्रमात असलेल्या ६० वृद्ध आजी आजोबांसोबत आपला वाढदिवस साजरा केला. यावेळी आस्थेने सर्व वृद्धांची ख्यालीखुशाली घेत रुपेश सावंत यांनी अन्नदान केले. यावेळी शिवसेना उबाठा उपतालुकाप्रमुख महेश उर्फ गोट्या कोळसुलकर, शिवसेना शिंदे उपतालुकाप्रमुख मंगेश गुरव जयदीप देसाई, समीर मण्यार आदी उपस्थित होते. दिविजा वृद्धाश्रमाच्या वतीने व्यवस्थापक समीर मिठबावकर यांनी स्वागत केले. रुपेश सावंत हे नेहमीच आपल्या अर्थार्जनातून सामाजिक बांधिलकी जोपासत असतात. दरवर्षी आपला वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी सावंत साजरा करतात. महिलांसाठी देवदर्शन सहल, होतकरू गरजू विद्यार्थ्यांना गणवेश वाटप, आरोग्य शिबिर आयोजित करणे, गरजू आर्थिक दुर्बलांना सहाय्य करणे असे सामाजिक उपक्रम राबवत असतात.

error: Content is protected !!