आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

ग्रामपंचायत पोटनिवडणुकीमध्ये कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचाच डंका…

आमदार निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली कुडाळ मालवण विधानसभेत विजयी घोडदौड कायम सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : नुकत्याच सिंधुदुर्ग जिल्ह्यात पार पडलेल्या ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत कुडाळ-मालवण विधानसभेत शिवसेनेचा वरचष्मा पुन्हा एकदा कायम राहिला आहे. जिल्हा परिषद निवडणुकी नंतर आता आमदार निलेशजी राणे यांच्या नेतृत्वाखाली…

मानवाधिकार संरक्षण संघटनेचे कोकण विभागीय अध्यक्ष संतोष नाईक यांना ‘कोकण रत्न सन्मान 2026’ प्रदान

जिल्हाधिकारी तृप्ती घोडमिसे यांच्या हस्ते संतोष नाईक यांचा ‘कोकण रत्न’ पुरस्काराने गौरव सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी तृप्ती घोडमिसे यांच्या हस्ते मानवाधिकार संरक्षण संघटनेचे कोकण विभागीय अध्यक्ष संतोष नाईक यांना कोकण रत्न सन्मान 2026 प्रदान करण्यात आला. त्यावेळी उपस्थित मा.…

मंत्री नितेश राणेंना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा

शांततेचा भंग प्रकरणात झालेल्या शिक्षेला स्थगिती” कोल्हापूर (प्रतिनिधी) : राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने मोठा दिलासा दिला आहे. जिल्हा व सत्र न्यायालयाने सुनावलेल्या एक महिन्याच्या कारावासाच्या…

आंबा व काजू पिकांचे पंचनामे तातडीने पूर्ण करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : जिल्ह्यात यंदा कडाक्याची थंडी आणि अवेळी पडलेल्या पावसामुळे आंबा व काजू या प्रमुख फळपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करून शासनाकडे मदतीचा प्रस्ताव सादर करावा, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे…

जिल्ह्याच्या दरडोई उत्पन्न वाढीत जिल्हा बँकेचा मोठा हातभार

मनीष दळवीं सारखे अभ्यासू नेतृत्व जिल्हा बँकेला राणेसाहेबांनी दिले – प्रमोद कामत जिल्हा बँक मठ शाखा स्थलांतर सोहळा संपन्न वेंगुर्ला (प्रतिनिधी) : आर्थिकदृष्ट्या सिंधुदुर्ग जिल्हा लहान असला तरी या वर्षी बँकेने ७००० कोटींचा व्यवसायाचा टप्पा पूर्ण केला व बँकेच्या ठेवींमध्ये…

विद्यार्थ्यांनी सरस्वतीचे उपासक बना लक्ष्मी आपसूक तुमच्याजवळ येईल!! डॉक्टर प्रसाद देवधर यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

कणकवली (प्रतिनिधी) : शिवराज मराठा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय साळगाव मध्ये डिजिटल वर्ग व एन. एम. एम. एस. परीक्षेत जिल्ह्यात प्रथम आल्याबद्दल कुमारी दुर्वा निलेश धुरी हिच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते विद्यार्थ्यांनी यशस्वी होण्यासाठी प्रयत्नात सातत्य ठेवावे,…

आईच्या गोष्टीतून उमगलेली सुबुद्धीची खरी व्याख्या

प्राण गेला तरी वचन न मोडणाऱ्या हरिणीची हृदयस्पर्शी कथा डॉ. रुपेश पाटकर बाबा शेतातून परतायला उशीर झाला तर दिवेलागणीला आई मला देवाच्या पुढ्यात घेऊन बसे. नेहमीची काही स्तोत्रे व मनाचे श्लोक ती माझ्याकडून म्हणून घेई. आणि शेवटी देवाकडे ‘बुद्धी दे’…

महामानवांच्या विचारांचा जागर आवश्यक : भास्कर जाधव

आचिर्णे बौद्ध विकास मंडळाचा सुवर्ण महोत्सव उत्साहात संपन्न संयुक्त जयंती उत्सवातून महामानवांच्या कार्याला अभिवादन वैभववाडी (प्रतिनिधी) : महामानवांच्या जयंत्या साजरे करत असताना त्यांच्या विचारांचा जागर होणे आवश्यक आहे. त्यांनी दिलेल्या मार्गावरून गेल्यास आपली प्रगती होऊ शकते. असे प्रतिपादन वैभववाडी तालुका…

खारेपाटण हायस्कूल व ज्युनियर कॉलेजच्या बहुद्देशीय सभागृहाचे रामेश्वरम मंदिर ट्रस्टी स्वामी राधाकृष्ण यांच्या शुभ हस्ते भूमिपूजन

खारेपाटण (प्रतिनिधी) : शैक्षणिक प्रगतीत मानाचा तुरा रोवणाऱ्या खारेपाटण हायस्कूल व ज्युनियर कॉलेजच्या नियोजित भव्य बहुद्देशीय सभागृहाचा भूमिपूजन सोहळा नुकताच रामेश्वरम मंदिर ट्रस्टचे सन्माननीय ट्रस्टी स्वामी राधाकृष्ण यांच्या शुभहस्ते खारेपाटण येथे संपन्न झाला. यावेळी या वास्तूची पहिली वीट स्वामीच्या हस्ते…

यशवंत कांबळे गुरुजी यांचेकडून खारेपाटण बुद्धविहारास साउंड स्पीकर भेट

खारेपाटण (प्रतिनिधी) : शेर्पे ता. कणकवली चे सुपुत्र व बौद्धजन सेवा संघ विभाग खारेपाटण या सामाजिक संघटनेचे माजी अध्यक्ष तथा सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक यशवंत रामचंद्र कांबळे गुरुजी यांनी नुकतीच खारेपाटण येथील बुद्धविहाराला अत्यावश्यक असणारी स्पीकर साउंड सिस्टिम भेट म्हणून दिली.…

error: Content is protected !!