खारेपाटण (प्रतिनिधी) : शेर्पे ता. कणकवली चे सुपुत्र व बौद्धजन सेवा संघ विभाग खारेपाटण या सामाजिक संघटनेचे माजी अध्यक्ष तथा सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक यशवंत रामचंद्र कांबळे गुरुजी यांनी नुकतीच खारेपाटण येथील बुद्धविहाराला अत्यावश्यक असणारी स्पीकर साउंड सिस्टिम भेट म्हणून दिली. यावेळी त्यांच्या पत्नी कांबळे मॅडम देखील उपस्थित होत्या. खारेपाटण पंचशील नगर येथील बुद्धविहारात आयोजित करण्यात आलेल्या बुद्धपोर्णिमा कार्यक्रमाच्या दिवशी कांबळे गुरुजी यांनी ही टकारा कंपनीची स्पीकर साउंड सिस्टिम माईक इत्यादी भेट वस्तू पंचशील विकास मंडळ खारेपाटण चे माजी अध्यक्ष संतोष पाटणकर यांचेकडे सुपूर्द केली. यावेळी पंचशील विकास नामंडळ खारेपाटण चे सचिव सागर पोमेडकर, अमित पाटणकर, माजी कार्यकर्ते संदीप पाटणकर मकरंद पाटणकर, ललित पाटणकर, पार्थिव पाटणकर आदी मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी मंडळाच्या वतीने कांबळे गुरुजी व त्यांच्या पत्नीचे सामाजिक दातृत्व दाखवत खारेपाटण बुद्धविहाराला स्पीकर साउंड सिस्टिम भेट दिल्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले.
यशवंत कांबळे गुरुजी यांचेकडून खारेपाटण बुद्धविहारास साउंड स्पीकर भेट












