कणकवली (प्रतिनिधी) : शिवराज मराठा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय साळगाव मध्ये डिजिटल वर्ग व एन. एम. एम. एस. परीक्षेत जिल्ह्यात प्रथम आल्याबद्दल कुमारी दुर्वा निलेश धुरी हिच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते विद्यार्थ्यांनी यशस्वी होण्यासाठी प्रयत्नात सातत्य ठेवावे, वाचनावर भर द्या, यशामध्ये सातत्य ठेवा, जबाबदारीने वागा, समाजाच्या आपल्या प्रति असणाऱ्या जबाबदाऱ्या ओळखून काम करा, तुमच्यामध्ये प्रतिभा असेल तर तुमच्या मागे भागीरथ ग्राम विकास प्रतिष्ठान असेल असे आश्वासन देत कुमारी दुर्वा धुरी सारख्या विद्यार्थिनी आपल्या समाजाची बौद्धिक संपत्ती आहे. आपण सर्वांनी ही संपत्ती वाढविण्याचा प्रयत्न करूया असे सर्वांना आवाहन केले व शिवराज मराठा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय ही माझी हक्काची शाळा आहे त्या शाळेच्या विकासासाठी मी सदैव आपल्या पाठीशी असेन असे आश्वासन डॉक्टर प्रसाद देवधर यांनी या प्रसंगी दिले. शिवराज मराठा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय साळगावच्या डिजिटल वर्ग खोली उद्घाटन व सत्कार कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्था सचिव प्रदीप प्रभूतेंडोलकर, माजी विद्यार्थी किरण सामंत, दादा मांजरेकर, भगीरथ प्रतिष्ठान झाराप चे नवीन मालवणकर, श्रीमती परब, प्रशालेचे मुख्याध्यापक सलीम तकीलदार कुमारी दुर्वा धुरीचे आई-वडील तसेच शिक्षक वृंद आदी उपस्थित होते. कुमारी दुर्वा धुरी ही एन. एम. एस. परीक्षेत जिल्ह्यात प्रथम आल्याबद्दल विद्यालयाच्या वतीने भेटवस्तू स्टडी टेबल व टेबल फॅन देऊन सत्कार करण्यात आला यावेळी एन. एम. विद्यार्थ्यांनी सरस्वतीचे उपासक बना लक्ष्मी आपसूक तुमच्याजवळ येईल !! डॉक्टर प्रसाद देवधर यांचे विद्यार्थ्यांना आवाहन शिवराज मराठा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय साळगाव मध्ये डिजिटल वर्ग व एन. एम. एम .एस. परीक्षेत जिल्ह्यात प्रथम आल्याबद्दल कुमारी दुर्वा निलेश धुरी हिच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते विद्यार्थ्यांनी यशस्वी होण्यासाठी प्रयत्नात सातत्य ठेवावे,वाचनावर भर द्या यशामध्ये सातत्य ठेवा जबाबदारीने वागा समाजाच्या आपल्या प्रति असणाऱ्या जबाबदाऱ्या ओळखून काम करा तुमच्यामध्ये प्रतिभा असेल तर तुमच्या मागे भागीरथ ग्राम विकास प्रतिष्ठान असेल असे आश्वासन देत कुमारी दुर्वा धुरी सारख्या विद्यार्थिनी आपल्या समाजाची बौद्धिक संपत्ती आहे.
आपण सर्वांनी ही संपत्ती वाढविण्याचा प्रयत्न करूया असे सर्वांना आवाहन केले व शिवराज मराठा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय ही माझी हक्काची शाळा आहे त्या शाळेच्या विकासासाठी मी सदैव आपल्या पाठीशी असेन असे आश्वासन डॉक्टर प्रसाद देवधर यांनी या प्रसंगी दिले. शिवराज मराठा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय साळगाव च्या डिजिटल वर्ग खोली उदघाटन व सत्कार कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्था सचिव प्रदीप प्रभूतेंडोलकर, माजी विद्यार्थी किरण सामंत, दादा मांजरेकर, भगीरथ प्रतिष्ठान झाराप चे नवीन मालवणकर, संपदा राणे, माजी विद्यार्थी तथा उद्योजक श्रीकांत भगत, प्रशालेचे मुख्याध्यापक सलीम तकीलदार, कुमारी दुर्वा धुरीचे वडील निलेश धुरी व आई नीता धुरी तसेच शिक्षक वृंद आदी उपस्थित होते. कुमारी दुर्वा धुरी ही एन. एम. एम. एस. परीक्षेत जिल्ह्यात प्रथम आल्याबद्दल विद्यालयाच्या वतीने भेटवस्तू स्टडी टेबल व टेबल फॅन देऊन सत्कार करण्यात आला यावेळी एन. एम. एम. एस. परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या कुमारी अस्मि सदानंद घाडी कुमारी दिया गोविंद हरमलकर कुमारी श्रावणी संभाजी कक्करकर विद्यार्थिनींना मान्यवरांच्या हस्ते भेटवस्तू देऊन कौतुक करण्यात आले. यावेळी सचिव प्रदीप प्रभूतेंडोलकर, यांनी भगीरथ प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉक्टर प्रसाद देवधर यांचे विद्यालयासाठी सुसज्ज डिजिटल लॅब व स्मार्ट टीव्ही उपलब्ध करून दिल्याबद्दल संस्थेच्या वतीने आभार व्यक्त केले व शाळा निश्चितपणे या डिजिटल लॅबचा चांगल्या पद्धतीने शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करेल असे आश्वासन दिले तसेच एन. एम. एम. एस. परीक्षेत धवल यश संपादित केलेल्या कुमारी दूर्वा धुरी व तिच्या पालकांचे विशेष कौतुक केले व विद्यार्थ्यांनी अशा विद्यार्थिनीचा वारसा जपण्यासाठी अभ्यासावर विशेष लक्ष देण्याचे याप्रसंगी आवाहन केले. कुमारी दुर्वा धुरीने आपल्या भावना व्यक्त करताना करताना आपल्या यशाचे श्रेय आई – वडिलांना तसेच विद्यालयाचे शिक्षक व वेळोवेळी प्रोत्साहन देणाऱ्या सर्व व्यक्तींना दिले आजचा हा सत्कार करून मला माझ्या जबाबदाऱ्या वाढल्याची जाणीव करून दिली असेही सांगितले व भविष्यात आपण आपल्या शाळेच नाव उज्वल करण्यासाठी आणखीन जोमाने प्रयत्न करेन असे सांगितले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक शिक्षक विद्यानंद पिळणकर यांनी केले तसेच कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशालेचे मुख्याध्यापक सलीम तकीलदार यांनी तर आभार सहाय्यक शिक्षक परशुराम नार्वेकर यांनी मानले. एन. एम .एम. एस .. परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या कुमारी अस्मि सदानंद घाडी कुमारी दिया गोविंद हरमलकर कुमारी श्रावणी संभाजी कक्करकर विद्यार्थिनींना मान्यवरांच्या हस्ते भेटवस्तू देऊन कौतुक करण्यात आले. यावेळी सचिव प्रदीप प्रभूतेंडोलकर, यांनी भगीरथ प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉक्टर प्रसाद देवधर यांचे विद्यालयासाठी सुसज्ज डिजिटल लॅब व स्मार्ट टीव्ही उपलब्ध करून दिल्याबद्दल संस्थेच्या वतीने आभार व्यक्त केले व शाळा निश्चितपणे या डिजिटल लॅबचा चांगल्या पद्धतीने शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करेल असे आश्वासन दिले तसेच एन. एम. एम .एस .परीक्षेत धवल यश संपादित केलेल्या कुमारी दूर्वा धुरी व तिच्या पालकांचे विशेष कौतुक केले व विद्यार्थ्यांनी अशा विद्यार्थिनीचा वारसा जपण्यासाठी अभ्यासावर विशेष लक्ष देण्याचे याप्रसंगी आवाहन केले. कुमारी दुर्वा धुरीने आपल्या भावना व्यक्त करताना करताना आपल्या यशाचे श्रेय आई – वडिलांना तसेच विद्यालयाचे शिक्षक व वेळोवेळी प्रोत्साहन देणाऱ्या सर्व व्यक्तींना दिले आजचा हा सत्कार करून मला माझ्या जबाबदाऱ्या वाढल्याची जाणीव करून दिली असेही सांगितले व भविष्यात आपण आपल्या शाळेच नाव उज्वल करण्यासाठी आणखीन जोमाने प्रयत्न करेन असे सांगितले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक शिक्षक विद्यानंद पिळणकर यांनी केले तसेच कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशालेचे मुख्याध्यापक सलीम तकीलदार यांनी तर आभार सहाय्यक शिक्षक परशुराम नार्वेकर यांनी मानले.












