Category बातम्या

जिल्ह्यात चार दिवस मुसळधार पावसाचा इशारा

नागरिकांनी दक्षता घ्यावीः आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : प्रादेशिक हवामान विभाग, मुंबई याच्यांकडून प्राप्त माहितीनुसार जिल्ह्यात दि. 5 जुलै रोजी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला असून, जिल्ह्यासाठी रेड अलर्ट (204 मी.मी. पेक्षा जास्त पाऊस)…

देवगड तालुक्यात पाऊस धुवाधार ; अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत

देवगड (प्रतिनिधी) : देवगड तालुक्यामध्ये मंगळवार तसेच बुधवारी दोन दिवस मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे तालुक्यातील अनेक रस्त्यांवरती पाणी साचल्याने वाहतुक खोळंबली होती. वाडा येथील ग्रामपंचायती नजीक रस्त्यावरुन पाणी जात असल्यामुळे बुधवारी सकाळी 7 ते 9 दरम्यान वाहतुक पुर्णपणे बंद होती.…

भाजप भटके विमुक्त आघाडी सरचिटणीस पदी मयूर चव्हाण

कणकवली देवगड वैभववाडी विधानसभा प्रभारी पदी रामचंद्र उर्फ बाळू कोकरे तर विधानसभा मंडल अध्यक्ष पदाच्या निवडी जाहिर कुडाळ (अमोल गोसावी) : कणकवली येथे भाजपा भटके विमुक्त आघाडी लोकसभा अध्यक्ष किरण चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा अध्यक्ष नवलराज काळे व जिल्हा पदाधिकारी…

आंबोली धबधबा परिसरात पर्यावरणास बाधा पोहचविणाऱ्यांवर कारवाई -उप वनसंरक्षक एस.नवकिशोर रेड्डी

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : आंबोली येथे वर्षा पर्यटनासाठी येणाऱ्या सर्व पर्यटकांना आवाहन करण्यात येते की, धबधब्याच्या ठिकाणी व घाट परिसरात तसेच वनहद्दीत कचरा करु नये. वनास व पर्यावरणास बाधा पोहोचवणारे कोणतेही कृत्य करु नये. भारतीय वन अधिनियम 1927 व वन्यजीव अधिनियम…

शरद पवार यांच्या मेळाव्याला सिंधुदुर्गातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची हजेरी

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खा.अमोल कोल्हे यांची भेट घेत दिली एकनिष्ठेची हमी सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : अजित पवार यांच्या बंडाळीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस चे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी मुंबई येथे आयोजित केलेल्या मेळाव्याला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.…

कुडाळ एसटी आगाराचे वेळापत्रक कोलमडले !

ऐन बाजारादिवशी एसटीच्या अधिकाऱ्यांचा भोंगळ कारभार कुडाळ (अमोल गोसावी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत असून त्यातच कुडाळच्या बाजारादिवशी कुडाळ एसटी आगाराचे वेळापत्रक कोलमडल्याचे दिसून आले. यामुळे बाजारासाठी कुडाळ शहरात येणाऱ्या नागरिकांचे अतोनात हाल झाले आहेत. सह्याद्रीच्या नजीक असलेल्या गावातून…

शिवसेना उपजिल्हाप्रमुखपदी हरेश पाटील, तालुका सचिव पदी रवींद्र नवाळे

जिल्हाप्रमुख संजय आग्रे यांनी जाहीर केली नियुक्ती कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग शिवसेना उपजिल्हाप्रमुख पदी हरेश पाटील यांची तर कणकवली तालुका सचिवपदी रवींद्र नवाळे यांची तालुका सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.शिवसेना मुख्य नेते तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार जिल्हाप्रमुख संजय…

भाजप भटके विमुक्त आघाडी जिल्हा उपाध्यक्ष तथा जिल्हा प्रभारी पदी मसुरे चे शांताराम उर्फ बाळा गोसावी यांची निवड

कुडाळ (अमोल गोसावी) : भारतीय जनता पार्टी भटके विमुक्त आघाडी सिंधुदुर्ग जिल्हा उपाध्यक्ष तथा जिल्हा प्रभारी पदी मसुरे मेढा वाडी चे सुपुत्र अखिल भारतीय कॅरम फेडरेशन चे उपाध्यक्ष शांताराम उर्फ बाळा गोसावी यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल…

अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड

अजित पवारांचा शरद पवारांना मोठा दणका ब्युरो न्यूज (मुंबई): राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आणखी एक भूकंप आला आहे. निवडणूक आयोगात अजित पवार गटाकडून 40 आमदारांच्या सह्याचं पत्र देण्यात आलं आहे. अजित पवारांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाल्याचं यात नमूद करण्यात आलं आहे. अजित…

आर पी बागवे हायस्कूल मसुरे येथे 6 जुलै राेजी गुणवंत विद्यार्थ्यांचा वार्षिक बक्षीस वितरण समारंभ..

मसुरे (प्रतिनिधी) : मसुरे एज्युकेशन सोसायटी मुंबई आणि लोकल कमिटी मसुरे आयोजित मदन राजाराम बागवे शिक्षण निधी योजना व संस्थेकडे दानशूर दात्याने ठेवलेल्या ठेवीवरील व्याजातून द्यावयाच्या पारितोषिकांचा जिल्हास्तरीय वार्षिक बक्षीस वितरण सोहळा गुरुवार दिनांक ६ जुलै रोजी संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर…

error: Content is protected !!