देवगड तालुक्यात पाऊस धुवाधार ; अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत

देवगड (प्रतिनिधी) : देवगड तालुक्यामध्ये मंगळवार तसेच बुधवारी दोन दिवस मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे तालुक्यातील अनेक रस्त्यांवरती पाणी साचल्याने वाहतुक खोळंबली होती. वाडा येथील ग्रामपंचायती नजीक रस्त्यावरुन पाणी जात असल्यामुळे बुधवारी सकाळी 7 ते 9 दरम्यान वाहतुक पुर्णपणे बंद होती. देवगड विजयदूर्ग मार्गावरील वाहतुक ठप्प हडपीड येथे घराची भिंत कोसळली.देवगडमध्ये सर्वाधिक २२३ मिमी पावसाची नोंद

मंगळवारी रात्रीपासून देवगड तालुक्यात मुसळधार पाऊस कोसळत असून बुधवारी सकाळी २२३ मिमी सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. यामुळे विदयुततारा तुटणे,वाहतुक बंद होणे व शेतजमिनीमध्ये पाणी साचले होते. बुधवारी पहाटे पावसाचा जोर वाढल्याने वाडा ग्रामपंचायत नजीक रस्त्यावरुन पावसाचे पाणी जात होते. यामुळे वाहतुक बंद झाली होती. तसेच तालुक्यामध्ये काहि ठिकाणी झाडे देखील उन्मळून पडली होती. संततधार पावसाने हडपीड येथील सुनिल दत्ताराम साळसकर यांच्या घराची भिंत कोसळून सुमारे दहा हजार 300 रूपयाचे नुकसान झाले.काहि गावांमध्ये भात लावणीला देखील सुरुवात करण्यात आली आहे. भात लावणीसाठी कातळ भागातील जमिनीसाठी चांगल्याप्रकारे पाऊस पडल्यामुळे अश्या ठिकाणची भात लावणीची कामे शेतक-यांनी सुरु केली आहेत.

error: Content is protected !!