अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड

अजित पवारांचा शरद पवारांना मोठा दणका

ब्युरो न्यूज (मुंबई): राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आणखी एक भूकंप आला आहे. निवडणूक आयोगात अजित पवार गटाकडून 40 आमदारांच्या सह्याचं पत्र देण्यात आलं आहे. अजित पवारांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाल्याचं यात नमूद करण्यात आलं आहे. अजित पवार यांनी बंड करुन शिंदे-फडणवीस सरकारबरोबर हातमिळवणी केली. त्यानंतर आता अजित पवार यांनी शरद पवार यांना आणखी एक धक्का दिल आहे. अजित पवारांना राष्ट्रवादीचे राष्ट्रीय नेते करुन थेट पवारांना आव्हान देण्यात आलंय. अजित पवारांना राष्ट्रीय नेते करण्याचा प्रस्ताव अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मांडला, त्याला मेळाव्याला उपस्थितांनी अनुमोदन दिलं. निवडणूक आयोगाकडे पाठवलेल्या पत्रात अजित पवार एनसीपी राष्ट्रीय अध्यक्ष असल्साचे म्हटल आहे. पवार यांच्या निवडीचा ठराव मंजूर केल्याचे पत्रात उल्लेख करण्यात आला आहे. अजित पवार गटानं निवडणूक आयोगाला 40 आमदारांच्या सह्यांचं पत्र दिलंय. या पत्रात 30 जूनला अजित पवारांची राष्ट्रीय अध्यक्षपदी एकमतानं निवड झाल्यांचं म्हंटलंय. विशेष म्हणजे शपथविधीच्या 2 दिवस आधीच अजित पवार गटाकडून निवडणूक आयोगाला हे पत्र देण्यात आल्याचं समोर आलंय. रविवारी म्हणजे 2 जुलैला अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. पण शपथ घेण्याच्या दोन दिवस आधीच म्हणजे 30 जूनला अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर दावा केला होता. तसंच विरोधी पक्षनेतेपदाचीही राजीनामा दिला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!