प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खा.अमोल कोल्हे यांची भेट घेत दिली एकनिष्ठेची हमी
सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : अजित पवार यांच्या बंडाळीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस चे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी मुंबई येथे आयोजित केलेल्या मेळाव्याला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेस चे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या सुचनेवरून मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथील सभागृहात राष्ट्रवादी च्या सर्व सेल च्या राज्यभरातील पदाधिकाऱ्यांची बैठक बुधवारी दुपारी 1 वाजता आयोजित केली होती. या बैठकीला जिल्हाध्यक्ष अमित सामंत, कोकण विभागाच्या महिला अध्यक्ष अर्चना घारे, जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर , महिला जिल्हाध्यक्ष रेवती राणे , जिल्हा चिटणीस रुपेश जाधव , कुडाळ तालुकाध्यक्ष शिवाजीराव भोगले, ओबीसी जिल्हाध्यक्ष बाळ कन्याळकर , कृषी सेवक जिल्हाध्यक्ष समीर आचरेकर , सावंतवाडी तालुका अध्यक्ष पुंडलिक दळवी, रोमन शेख, अजीम शेख , देवेंद्र टेमकर ,सुधीर कुबल , दीपक जाधव, देवेंद्र पिळणकर, सागर वारंग , प्रतीक सावंत आदींसह जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी शरद पवार यांच्या मेळाव्याला उपस्थित होते. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खा.अमोल कोल्हे यांची भेट घेत या सर्व पदाधिकाऱ्यांनी आपण पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत राहणार असल्याचे सांगत एकनिष्ठेची हमी दिली.













