Category मसुरे

गोळवण ग्रामसभा १२डिसेंबर रोजी

मसुरे (प्रतिनिधी) : ग्रामपंचायत कार्यालय गोळवण-कुमामे-डिकवल येथे १२ डिसेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता “ग्रामसभा” आयोजित करण्यात आली आहे. ग्रामसभेला वेळीच उपस्थित राहाण्याचे आवाहन सरपंच सुभाष लाड, उपसरपंच शरद मांजरेकर, ग्रामसेविका अर्पिता शेलटकर यांनी केले आहे.

कृषीकन्यानी केली भाजीपाला लागवड

मसुरे (प्रतिनिधी): डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ अंतर्गत, उद्यान विद्या महाविद्यालय-मुळदे महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ग्रामीण कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत पोईप येथेवेळ वर्गीय भाजीपाला प्रात्यक्षिक सादर केले. सदर विद्यार्थी हे शेती विषयक ज्ञानाची शेतकऱ्यांबरोबर देवाणघेवाण करीत आहेत. वेलवर्गीय भाजीपाला काकडी, कारले, दुधीभोपळा,पडवळ, भेंडी,…

गोळवण येथे आधार कार्ड शिबिरास प्रतिसाद !

मसुरे (प्रतिनिधी) : ग्रामपंचायत गोळवण आणि गोळवण पोस्ट ऑफीस यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या आधार कार्ड कॅम्पचा शुभारंभ ग्रामपंचायत गोळवण – कुमामे – डिकवल चे सरपंच सुभाष लाड, उपसरपंच शरद मांजरेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. यावेळी पोस्ट मास्तर अंतरा…

अक्कलकोट मध्ये थ्रोबॉल व सॉफ्टफुटबॉल राज्य स्पर्धेचे थाटात उदघाटन

मसुरे (प्रतिनिधी): श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान अक्कलकोट ,थ्रोबॉल असोसिएशन सोलापूर, सोलापूर शहर व जिल्हा सॉफ्ट फुटबॉल असोसिएशन व महेशजी इंगळे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून व महाराष्ट्र थ्रोबॉल असोसिएशन यांच्या मान्यतेने 29 वि सब ज्युनिअर व 33 वी सीनियर राज्यस्तरीय…

श्री भगवती हायस्कुल मुणगे आणि शेठ म.ग. हायस्कुल प्रथम

राष्ट्रीय बाल विज्ञान परिषद सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय ऑनलाईन सादरीकरण संपन्न मसुरे (प्रतिनिधी): राष्ट्रीय बाल विज्ञान परिषद सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय ऑनलाईन सादरीकरण नुकतेच संपन्न झाले. सदर सादरीकरणातून लहान गटात शेठ म.ग.हायस्कूल देवगडची अनुष्का व आयेशा दामोधर प्रथम तर मोठ्या गटात भगवती हायस्कूल मुणगेचे…

कृषी अधिकारी विश्वनाथ गोसावी यांची उणीव कृषी विभागाला जाणवेल! जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी विजयकूमार राऊत यांचे गौरवोद्गार

मालवण तालुका कृषी अधिकारी विश्वनाथ गोसावी यांचा सेवानिवृत्तीपर सत्कार मसुरे (प्रतिनिधी): आज माझ्या सेवानिवृत्ती दिवशी आपण सर्व सहकाऱ्यांनी माझा केलेला सन्मान सदैव स्मरणात राहील. नोकरीच्या कालावधीत सर्व जेष्ठ आणि कनिष्ठ अधिकारी, कर्मचारी यांचे चांगले सहकार्य मिळाल्या मुळे शेतकऱ्यांसाठी चांगले काम…

बॅ नाथ पै सेवांगण कट्टा येथे संविधान दिन साजरा

मसुरे (प्रतिनिधी): बॅ नाथ पै सेवांगण कट्टा शाखेत संविधान दिन साजरा करण्यात आला. प्रारंभी मनोज काळसेकर यानी संविधान दिनाचे महत्व सांगितले. भारताचे संविधान लिखीत स्वरूपात असून जगातील सर्वात मोठे संविधान आहे. संविधानाचे हस्तलिखीत सुद्धा उपलब्ध आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे फार…

दिपोत्सवाने उजळले अक्कलकोट वटवृक्ष मंदीर

त्रिपुरारी पौर्णिमेस स्वामी भक्तांची मंदियाळी मसुरे (प्रतिनिधी): अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात त्रिपुरारी पौर्णिमा मोठ्या भक्ती भावात साजरी झाली. त्रिपुरारी पौर्णिमेस महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या हजारो स्वामी भक्तांनी श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. यानिमित्त दिवसभर विविध कार्यक्रम आयोजित…

प्रधानमंत्री फसल बिमा योजनेंतर्गत शेतकऱ्यांनी सहभाग घ्यावा !

तालुका कृषी अधि. विश्वनाथ गोसावी यांचे आवाहन मसुरे (प्रतिनिधी) : प्रधानमंत्री फसल बिमा योजनेंतर्गत पुनर्रचित हवामानावर आधारित फळपिक विमा योजनाही योजना मालवण तालुक्यातील आंबा व काजू पिकासाठी सर्व महसूल मंडळासाठी लागू आहे. महसूल मंडळ स्तरावर असलेल्या शासकीय हवामान केंद्रावरील आकडेवारीवरून…

श्री भगवती हायस्कुल मुणगेच्या देवांग मेस्त्रीची कलाकृती राज्यात प्रथम !

राष्ट्रीय स्पर्धेत करणार राज्याचे नेतृत्व मसुरे(प्रतिनिधी) : पुणे येथे आयोजित राज्यस्तरीय कला उत्सव २०२३ स्पर्धेत स्थानिक खेळणी बनवणे कला प्रकारात (मुलांमध्ये) देवगड तालुक्यातील मुणगे येथील श्री भगवती हायस्कूलचा नववीतील विध्यार्थी कु. देवांग रघुनाथ मेस्त्री याने प्रथम क्रमांक पटकावला आहे.  त्याची…

error: Content is protected !!