गोळवण ग्रामपंचायत येथे सभामंडपाचे उदघाटन

मसुरे (प्रतिनिधी): ग्रामपंचायत गोळवण-कुमामे येथे ग्रामसभेचे औचित्य साधुन “आदर्श गाव” योजने अंतर्गत प्रेरक प्रवेश अनुदानातून पुर्ण झालेल्या “ग्रा.पं. गोळवण-कुमामे-डिकवल येथे सभामंडप बांधणे” या विकास कामाचा उद्घाटन सोहळा ग्रामस्थांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडला. यावेळी पं. स. मालवण चे मा. गटविकास अधिकारी उच्च स्तर वर्ग-१ आप्पासाहेब गुजर, उपविभागीय कृषि अधिकारी पी. बी. ओहोळ, जिल्हा कृषि अधिक्षक कार्यालय सिंधुदुर्गचे तंत्र अधिकारी आप्पासाहेब पाटील, पं. स. मालवण कृषि अधिकारी संजय गोसावी , विस्तार अधिकारी (ग्रा.पं.) पी. डी. जाधव, तालुका कृषि अधिकारी ए. एल. गुरव , कृषि पर्यवेक्षक डी. के. सावंत यांच्या उपस्थितीत सभामंडपाचे उद्घाटन करण्यात आले. तसेच सदरच्या ग्रामसभेत पं. स. मालवण चे माजी सभापती अजिंक्य पाताडे यांची राजश्री शाहू महाराज वृद्ध साहित्यिक व वृद्ध कलावंत इ. ना. मानधन योजना जिल्हा स्तरीय समिती मध्ये सदस्य म्हणून निवड झाल्याबद्दल त्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी ग्रा. पं. गोळवण – कुमामे – डिकवल सरपंच सुभाष लाड, उपसरपंच शरद मांजरेकर, ग्रामसेविका अर्पिता शेलटकर, ग्रा.प. सदस्य साबाजी गावडे, विरेश पवार, प्राजक्ता चिरमुले, मेघा गावडे, शिल्पा तेली, एकादशी गावडे, पोलिस पाटील, शाळा मुख्याध्यापक, कृषि सहाय्यक, आरोग्य सेवक, सेविका, ग्रामपंचायत कर्मचारी बाळाराम परब, करुणा राणे,रामकृष्ण नाईक, दत्ताराम परब तसेच ग्रामसभे साठी २२५ ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!