मसुरे(प्रतिनिधी) : देवगड तालुक्यातील मुणगे गावच्या सरपंचपदी भाजपच्या अंजली अशोक सावंत यांची शुक्रवारी बिनविरोध निवड करण्यात आली. सर्व सदस्यांनी मला बिनविरोध निवडून दिल्या बद्दल सर्वांचे आभार मानते. सर्वांच्या सहकार्यातून गावातील विकासकामे पूर्ण करण्याचा आपला प्रयत्न राहील असे प्रतिपादन नवनिर्वाचित सरपंच अंजली अशोक सावंत यांनी यावेळी केले.
सरपंच पदासाठी अडीज- अडीज वर्षाचा कार्यकाल निश्चित करण्यात आला होता. त्यानुसार भाजपच्या साक्षी गुरव यांनी अडीज वर्षे पुर्ण झाल्यामुळे सरपंच पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे सरपंच पदाचा प्रभारी कार्यभार उपसरपंच संजय घाडी यांच्याकडे सोपविण्यात आला होता. यावेळी प्रभारी सरपंच संजय घाडी, ग्रामपंचायत सदस्य धर्माजी आडकर, रविना मालाडकर, संजय घाडी,परिता नाटेकर , तसेच मुणगे सोसायटी अध्यक्ष गोविंद सावंत, ग्रामसेवक कुबल, भाजप जिल्हा कार्य. सदस्य संजय बांबुळकर, मुंबई येथील सामाजिक कार्यकर्ते तथा यशस्विनी प्रतिष्ठान अध्यक्ष आनंद मालाडकर, अशोक सावंत, सुनील सावंत, अशोक सावंत, सुरबा सावंत,पोलीस पाटील साक्षी गोविंद सावंत, सुविधा बोरकर आदी ग्रामस्थ व कार्यकर्ते उपस्थित होते.
