सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती सिंधुदुर्ग आयोजित इयत्ता 5 वी शिष्यवृत्ती सराव परीक्षेत जिल्हास्तरीय टाॅप 10 गुणवत्ता यादीत प्रथम वेंगुर्ला वजराठ नं 1 शाळेचा कर्तव्य तेजस बांदिवडेकर (286 गुण) आला, द्वितीय सावंतवाडी नं 2 चा दुर्वांक किशोर वालावलकर( 260गुण) व वेदांत तुकाराम पाटील साटेली भेडशी दोडामार्ग आले तर देवगड साळशी नं 1 ची आर्या गावकर तृतीय आली. या सराव परीक्षेस जिल्ह्यातील एकाचवेळी सर्व तालुक्यात 120 परिक्षा केंद्रावर 2082 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते.अशी माहिती जिल्हाध्यक्ष नारायण नाईक व जिल्हासरचिटणीस सचिन मदने यांनी दिली.
जिल्हास्तरीय टाॅप 10 गुणवत्ता यादीत चौथा गोपाळ जयवंत पवार कडावल नं 1 कुडाळ (250 गुण) व कु मुग्धा प्रशांत टोपले सावंतवाडी नं 2 (250 गुण),पाचवा रणवीर राजेंद्र शेळके सावंतवाडी नं 2 (248 गुण),सहावी कु प्रतिमा मिठबावकर सौंदाळे गावठण देवगड (246 गुण),सातवा ओम मुरली भणगे घोटगेवाडी दोडामार्ग (244) व देवेंद्र दिपक गावडे चौकुळ नं 5 नेनेवाडी सावंतवाडी (244 गुण),आठवा वेदिका जयवंत वजराठकर वेंगुर्ला( 242 गुण)व भाविका हेमंत भरणकर घोणसरी नं 5 कणकवली (242 गुण),नववा अजहर जाकीर शेख कासार्डे नं1 कणकवली (240गुण) व अनुष्का विभीषण चौगुले सर्जेकोट मिर्याबांध मालवण (240गुण),दहावा पूर्वा नरेश परब वजराट नं1 वेंगुर्ला (238 गुण) व स्वयम आपाजी पाटील सावंतवाडी नं( 2 238 गुण) यशस्वी झाले आहेत. दरम्यान, परिक्षा परवानगी देण्याचा निर्णय घेणारे सिंधुदुर्ग मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर व प्राथमिक शिक्षणाधिकारी महेश धोत्रे यांचे शिक्षक समिती सिंधुदुर्गच्यावतीने विशेष आभार मानण्यात आले.