मालवण (प्रतिनिधी) : सिंधुदुर्गात एक लाख पेक्षा जात मताधिक्य घेऊन महायुतीचे उमेदवार निलेश राणे, नितेश राणे, दीपक केसरकर हे विजयी होणार. सोबतच महायुती सरकार मध्ये जिल्ह्याला चांगले प्रतिनिधित्व मिळणार. असा ठाम विश्वास भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी व्यक्त केला आहे.
मालवण तालुक्यात मतदानाचा आढावा घेत असता त्यांनी बुथवर भेट देत पदाधिकारी कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधला. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर उपस्थित होते.
‘मेरा बुथ सबसे मजबूत’ यां धोरणातून भाजपा काम करत असताना बूथवर लक्ष देऊन काम करण्यात आले. त्याचा फायदा प्रत्येक ठिकाणी झाला. जास्त मतदान मालवण मतदारसंघात झाले. महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांना प्रचारात मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद तसेच झालेले जास्तीचे मतदान पाहता निलेश राणे मोठ्या मताधिक्याने विजयी होतील.
संघटना म्हून झालेले चांगले काम, सरकार म्हून असलेले चांगले काम, उमेदवार यांचा मतदारसंघात असलेला संपर्क हे सगळे जुळून आले. सोबत आमचे नेते खा. नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनात अनेक विकासकामे झाली. त्याचाही मोठा फायदा झाला. जिल्ह्यात महायुती तीनही उमेदवार एक लाख पेक्षा जास्त मताधिक्य घेऊन विजयी होणार असा विश्वास प्रभाकर सावंत यांनी व्यक्त केला.