ब्युरो (न्युज) : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान जनरल परवेझ मुशर्रफ यांचे दुबईतील रुग्णालयात दीर्घ आजाराने निधन झाले आहे. मुशर्रफ हे पाकिस्तानच्या लष्कराचे माजी प्रमुख देखील होती. परवेझ मुशर्रफ हे बरेच दिवस आजारी होते. मुशर्रफ यांना हृदयविकारासह इतर व्याधी होत्या. परवेझ मुशर्रफ यांनीच 1999 मध्ये तत्कालीन पंतप्रधान नवाझ शरीफ यांना न सांगता भारताविरुद्ध कारगिल युद्ध सुरू केले होते.मार्च 2016 मध्ये मुशर्रफ उपचारासाठी दुबईला गेले होते, तेव्हापासून त्यांच्यावर तिथे उपचार सुरू होते. याआधीही त्यांच्या मृत्यूच्या बातम्या आल्या होत्या, मात्र त्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी त्याचे खंडन केले होते. प्रदीर्घ आजारपणात त्यांना अनेकदा व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. मात्र यावेळी त्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.