जि.प.केंद्र शाळा खारेपाटण नं.१ येथे सिंधुदुर्ग टॅलेंट सर्च परीक्षेचा शुभारंभ


युवा संदेश प्रतिष्ठान नाटळ – सांगवे च्या वतीने आयोजन


खारेपाटण (प्रतिनिधी) : युवा संदेश प्रतिष्ठान नाटळ – सांगवे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सिंधुदुर्ग टॅलेंट सर्च परीक्षा – २०२३ या स्पर्धा परीक्षेचा खारेपाटण केंद्रावरील परीक्षेचा शुभारंभ कणकवली तालुक्यातील जि.प.पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा खारेपाटण नं.१ येथे खारेपाटण केंद्र शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री संतोष पाटणकर यांच्या शुभहस्ते आज दीप प्रज्वलन करून करण्यात आले.


सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्री संदेश उर्फ गोट्या सावंत यांच्या सौजन्याने संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा दरवर्षी संदेश प्रतिष्ठानच्या वतीने घेण्यात येते. खारेपाटण केंद्र शाळा नं.१ येथील परीक्षा केंद्र उदघाटन प्रसंगी खारेपाटण केंद्र शाळेच्या माता – पालक संघाच्या उपाध्यक्षा सौ प्रियंका गुरव,खारेपाटण ग्रा.प. सदस्या सौ मनाली होनाळे,सौ शितिजा धुमाळे,खारेपाटण गट विकास सेवा सोसायटीचे सचिव श्री कृष्णा कर्ले,खारेपाटण पोलीस दूरशेत्राचे अमलदार श्री उद्धव साबळे, खारेपाटण परीक्षा केंद्राचे संजय तांबे सर, हसोळटेंब – कोंडवाडी शाळा समिती अध्यक्ष श्री राऊत,खारेपाटण शाळेच्या माता – पालक संघाच्या सदस्या सौ.संध्या पोरे,खारेपाटण केंद्र शाळेचे मुख्यध्यापक श्री प्रदीप श्रावणकर सर आदी मान्यवर उपस्थित होते.


खारेपाटण केंद्र शाळा येथील सिंधुदुर्ग टॅलेंट सर्च परीक्षा केंद्रावर आजुबाजूच्या शाळेतील सुमारे ९६ विद्यार्थ्यांनी आपला सहभाग दर्शविला होता.उपस्थित सर्व मान्यवरांचे खारेपाटण केंद्र शाळेचे मुख्याध्यापक श्री प्रदीप श्रावणकर सर यांनी पुष्गुच्छ देऊन स्वागत केले.
“युवा संदेश प्रतिष्ठानच्या वतीने खारेपाटण केंद्र शाळेत प्रथमच परीक्षा केंद्र मंजूर झाल्यामुळे येथील विद्यार्थ्यांची सोय झाली असून सिंधुदुर्ग टॅलेंट सर्च परीक्षेच्या माध्यमातून जिल्ह्यातील विद्यार्थी हा गुणवत्तेत अग्रेसर रहावा.तसेच पुढे जाऊन स्पर्धा परीक्षेत जिल्ह्याचे नाव उज्ज्वल करावे.हा उद्देश असून यामुळे जिल्ह्यात गुणवान विद्यार्थी घडण्यास मदत होणार असल्याचे, भावपूर्ण उदगार खारेपाटण केंद्र शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री संतोष पाटणकर यांनी उद्घाटन प्रसंगी काढले.”
या परीक्षा केंद्रावर परीक्षक म्हणून खारेपाटण व शेर्पे केंद्रातील प्राथमिक शिक्षकांनी सहकार्य केले. युवा संदेश प्रतिष्ठान आयोजित सिंधुदुर्ग टॅलेंट सर्च परीक्षेच्या खारेपाटण केंद्र शाळा येथील उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी उपस्थित शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री संतोष पाटणकर,सौ प्रियंका गुरव,कृष्णा कर्ले,श्री संजय तांबे,शाळेचे मुख्याद्यापक प्रदीप श्रावणकर सर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!