13 फेब्रुवारी पर्यंत सुनावली पोलीस कोठडी
सरकारी वकील रुपेश देसाई यांचा यशस्वी युक्तिवाद
सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : पंढरपूर येथील सुशांत खिलारे याला मारहाण करून ठार मारल्याच्या गुन्ह्यात आरोपी तुषार माने याच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात आली आहे. आरोपी तुषार माने याला 13 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आरोपी तुषार याच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्यामुळे आज त्याला विशेष जिल्हा व सत्र न्यायालयासमोर हजर करण्यात आले. सरकारी वकील रुपेश देसाई यांनी आणखी तपासासाठी आरोपी तुषार माने च्या पोलीस कोठडीसाठी युक्तिवाद केला.या गुन्ह्यातील अन्य आरोपींसोबत तुषार माने चे मोबाईल संभाषण झाले आहे त्यामुळे आरोपीच्या आवाजाचा नमुना तपासणीसाठी पाठवायचा आहे, मयत सुशांत खिलारे चे प्रेत पुरावा नष्ट करण्यासाठी आंबोली घाटात फेकले. त्याचप्रमाणे अन्य काही पुरावे नष्ट करण्यासाठी आंबोली घाटात फेकले असण्याची शक्यता असून त्याचा तपास करणे, या गुन्ह्यातील अन्य आरोपी 13 फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडीत असून साखळीयुक्त पुरावा गोळा करणे आवश्यक असल्याने आरोपींची एकमेकांशी रुजवात घालून तपास करणे, अन्य आरोपी असल्याच्या शक्यतेचा तपास करणे, मयत सुशांत चे प्रेत आंबोली घाटात आणेपर्यंत अन्य कोणी आरोपी या गुन्ह्यात सामील होते काय आदी बाबींसाठी तुषार माने ला वाढीव पोलीस कोठडी ची मागणी सरकारी वकील देसाई यांनी केली. देसाई यांचा युक्तिवाद ग्राह्य धरत विशेष जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपी तुषार माने ला 13 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली