राज्य सरकारी निमसरकारी शिक्षक शिक्षकेतर नगरपालिका कर्मचाऱ्यांचे काम बंद धरणे आंदोलन

जुनी पेन्‍शन मिळावी या प्रमुख मागणीसह इतर १८ मागण्यांसाठी छेडले आंदोलन

सिधुदूर्गनगरी (प्रतिनिधी) : राज्य सरकारी निमसरकारी शिक्षक शिक्षकेतर नगरपालिका कर्मचारी समन्वय समिती सिंधुदुर्ग यांच्यावतीने जुन्‍या पेन्‍शन लागु करावी या प्रमुख मागणीसह विविध मागण्याकड़े लक्ष वेधण्यासाठी आज कर्मचाऱ्यांनी काम बंद ठेऊन धरणे आंदोलन छेडले. राज्य सरकारी कर्मचारी विविध संघटनां एकत्र येत आज पासुन बेमुदत काम बंद आंदोलन छेडले असून जुनी पेन्‍शन मिळावी या प्रमुख मागणीसह रिक्‍त पदे भरती, आठव्‍या वेतन आयोगाचे तात्‍काळ गठन करणे, अनुकंपा तत्‍वावरील नियुक्‍त्‍या तात्‍काळ करणे व इतर १८ मागण्‍या शासना समोर ठेवल्या आहेत. या मागण्यासाठी राज्‍यातील कर्मचारी आज १४ डिसेंबर पासून बेमुदत संपावर गेले आहेत. तर आपल्या मागण्याकड़े शासनाचे लक्ष वेधण्यासाठी त्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले.

यामध्‍ये सिंधुदुर्ग जिल्‍हयातील सर्व राज्‍य सरकारी कर्मचारी, निमसरकारी , शिक्षक शिक्षकेत्‍तर कर्मचारी, सर्व महसुल, तलाठी, ग्रामसेवक , आरोग्‍य कर्मचारी, आयटीआय , सार्वजनिक बांधकाम विभाग, जलसंपदा , वस्‍तु सेवा कर या सह सर्व विभागाचे कर्मचारी सहभागी झाले आहेत.आज जिल्‍हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून तसेच शासनाच्या धोरणा विरोधात घोषणा देऊन परिसर दणानुण सोडला. राज्‍य सरकारी कर्मचारी संघटना अध्‍यक्ष व समन्‍वय समिती सरचिटणीस श्री.सत्‍यवान माळवे यांच्या नेतृत्वाखाली आजचे हे आंदोलन करण्यात आले. तर आजच्या या आंदोलनात मोठ्या संखेने कर्मचाऱ्यांनी सहभाग घेत आंदोलन यशस्वी केल्याचा दावा संघटनेचे अध्यक्ष सत्यवान मालवे यांनी केला आहे. तसेच आज १४ डिसेंबर पासुन पुकारलेल्या बेमुदत संपामध्‍ये सर्व कर्मचारी यांनी सहभागी झाले असून या संपाची दखल शासनाला घ्यावीच लागेल असेही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले. यावेळी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना सरचिटणीस राजन वालावलकर, उपाध्यक्ष सखाराम सकपाळ, सचिन माने, शाम लाखे, कोषाध्‍यक्ष, जुनी पेन्‍शन हक्‍क संघटना व प्रमुख मागर्दशक प्रविण पाताडे ,संजय पवार यांचे सह विवीध प्रवर्ग निहाय संघटनेचे पदाधिकारी या आंदोलनात सहभागी झाले होते.

राज्य सरकारी निमसरकारी कर्मचारी समन्वय समितीच्या वतीने पुकारलेल्या संपात जिल्ह्यातील विविध विभागातील कर्मचारी मोठ्या प्रमाणात सहभागी झाले असल्याने शासकीय कार्यालयांमध्ये आज शुकशुकाट पसरल्याचे दिसून येत होते. काही तुरळक प्रमाणात कर्मचारी कार्यालयात उपस्थित असल्याचे दिसून आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!