राज्यात प्रथम आलेल्या देवांग मेस्त्रीचा मुणगे हायस्कुल येथे सत्कार
मसुरे (प्रतिनिधी) : कला उत्सव स्पर्धेत या प्रशालेचा विध्यार्थी राज्यात पहिला आला ही गौरवास्पद बाब आहे.ग्रामीण भागात मोठी चमक आहे हे त्याने दाखवून दिले आहे.सोशल मीडियाचा चुकीचा वापर करू नका.सोशल मीडिया वापरताना तुमच्या आदर्श्याना अनुभवा.जे कला क्षेत्र निवडाल त्यात परिपूर्ण बना. बाहेर स्पर्धा खुप मोठी आहे.भविष्यात आव्हाने पेलण्यासाठी कलेशी मैत्री करा असे प्रतिपादन कट्टा हायस्कुल चे कला शिक्षक व प्रसिद्ध रांगोळीकार समीर चांदरकर यांनी मुणगे येथे केले.
शालेय शिक्षण व साक्षरता विभाग, नवी दिल्ली आणि एनसीईआरटी,नवी दिल्ली व महाराष्ट्र प्रथमिक शिक्षण परिषद, मुंबई आणि राज्य शैक्षणिक संशोधन वप्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र,पुणे यांच्या संयुक्त विध्यमाने पुणे येथे राज्यस्तरीय कला उत्सव २०२३ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेत स्थानिक खेळणी बनवणे कला प्रकारात (मुलांमध्ये) देवगड तालुक्यातील मुणगे येथील श्री भगवती हायस्कूलचा नववीतील विध्यार्थी कु.देवांग रघुनाथ मेस्त्री याने राज्यात प्रथम क्रमांक पटकावल्या बद्दल श्री भगवती एज्युकेशन सोसायटीच्या वतीने देवांग सह त्याच्या पालकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर संस्था अध्यक्ष न. ना. पंतवालावलकर, उपाध्यक्ष सुरेश बांदेकर,कार्याध्यक्ष नारायण आडकर, मुख्याध्यापिका श्रीमती एम बी कुंज, शाळा समिती अध्यक्ष निलेश परुळेकर, माजी प स सदस्या संजीवनी बांबूळकर, पोलीस पाटील सौ साक्षी गोविंद सावंत, वसंत गुरव, व्यवस्थापक आबा पुजारे,वसंत शेट्ये, नाना बागवे, संतोष लब्दे, रघुनाथ मेस्त्री, सौ मेस्त्री आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना संस्था अध्यक्ष न. ना. पंतवालावलकर म्हणाले, अंगभूत कलेला वाव मिळावा म्हणून संस्था यापुढेही प्रोत्साहन देत राहील. देवांग मेस्त्री याने राज्यस्तरावर यश मिळवत शाळेचे, गावाचे नाव उज्वल केले आहे. शाळा शैक्षणिक तसेच कला, क्रीडा क्षेत्रात सुद्धा पुढे जात आहे ही बाब कौतुकास्पद आहे. यावेळी कला स्पर्धा, विज्ञान प्रदर्शन, प्रज्ञा शोध परीक्षा, क्रीडा स्पर्धेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ग्रा. सदस्य प्रमोद सावंत, दशरथ सावंत,अंजली सावंत, सौ रवीना मालाडकर, धर्माजी आडकर, अनुप मुणगेकर,संदेश मुणगेकर, विनय मुणगेकर, अजित रासम, सुनील सावंत, शरयू घाडी, राजू बोरकर,राजू पुजारे, प्रकाश सावंत, श्री सावंत, सुविधा बोरकर,शालिनी मेस्त्री, प्रसाद बागवे, सौ कुमठेकर, सौ गौरी तवटे, प्रणय महाजन, प्रसाद मांजरेकर, सौ मिताली हिर्लेकर, प्रियांका कासले, झुंजार पेडणेकर, स्वप्नील कांदळगावकर आदी शिक्षक, ग्रामस्थ उपस्थित होते.सुत्रसंचलन प्रसाद बागवे, सौ गौरी तवटे, प्रास्ताविक एम. बी. कुंज, आभार सौ. कुमठेकर यांनी मानले.















