कुडाळ शहरातील बाल उद्यानाची दयनीय अवस्था

कुडाळ (प्रतिनिधी) : येथील पोलीस ठाण्यासमोर असलेल्या बालउद्यानाची दयनीय अवस्था झाली असून त्याकडे संबंधित प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहेत. असून स्थितीत ठिकाणी मुले खेळताना इजा होण्याची भीती आहे. त्यामुळे ती तात्काळ दुरुस्त करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांच्या वतीने करण्यात आली आहे. दरम्यान उन्हाळी सुट्टीच्या पूर्वी उद्यानातीत खेळण्यांची दुरुस्ती न झाल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही नगरपंचायत प्रशासनाला देण्यात आला आहे. याबाबत प्रसिद्धीपत्रक देण्यात आले. त्यात असे नमूद करण्यात आले आहे की, मे महिन्याची सुट्टी जवळ येत असून त्यावेळी मुले विरंगुळ्यासाठी आपल्या पालकांसोबत संबंधित उद्यानात येतात आणि ह्या खेळण्यांच्या सहाय्याने त्याच्या सुट्टीची मजा घेतात. परंतु आज जर आपण उद्यानामध्ये गेलात तर त्या ठिकाणचे खेळण्याचे साहीत्य मोडलेले आहे. आणि आहे. मुलांनी त्यांचा वापर केला तर मुले त्यावरून खाली पडून त्यांना दुखापत होऊ शकते, तसेच सदर साहीत्य हे लोखंडाचे असल्यामुळे मुलाना गंभीर आजार इन्फेक्शन होऊ शकते, तरी कुडाळ नगर पंचायत प्रशासनाने यावर गंभीर लक्ष नाही. मुलांची शारीरिक, बौध्दीक तसेच त्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी कुडाळात बाराची गरज आहे. तसेच त्यांना मोबाईल जगातून मोकळ्या जागेत आणणेची पालकांना एक ही सुसंधी मिळते. त्यामुळे नगर पंचायत शासनाने मुलांना उन्हाळी सुट्टी पूर्वी उद्यानात मोडकळीस आलेली खेळणी दुरुस्त करून किंवा नवीन खेळणी बसून द्यावीत. अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा त्यांनी दिला आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!