खारेपाटण (प्रतिनिधी) : “मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा ” या उपक्रमांतर्गत आज केंद्र स्तरीय समितीने कणकवली तालुक्यातील जि.प.केंद्र शाळा खारेपाटण नं.१ या शाळेला सावडाव केंद्रप्रमुख व शाळा मूल्यमापन समिती प्रमुख श्री सद्गुरू कुबल यांच्या नेतृत्वाखाली भेट दिली. व संपूर्ण शाळेची पाहणी केली.
यावेळी त्यांच्या समवेत नांदगाव माध्यमिक हायस्कूलचे शिक्षक नारकर सर,खारेपाटण केंद्राचे केंद्र प्रमुख संजय पवार सर आदी समिती सदस्य उपस्थित होते. तर यावेळी खारेपाटण जि.प.केंद्र शाळा नं.१ च्या शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा प्राप्ती कट्टी, माजी अध्यक्ष संतोष पाटणकर, खारेपाटण केंद्र शाळेचे उच्च श्रेणी मुख्याध्यापक प्रदीप श्रावणकर सर आदी मान्यवर उपस्थित होते.
महाराष्ट्र शासनाच्या वतीने ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा” या उपक्रमांतर्गत आज भेट दिलेल्या केंद्र स्तरीय समितीचे शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने अध्यक्ष प्राप्ती कट्टी यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष संतोष पाटणकर खारेपाटण केंद्र शाळेचे उच्च श्रेणी मुख्याध्यापक प्रदीप श्रावणकर सर, शाळेच्या सहाय्यक शिक्षिका रेखा लांघी, अलका मोरे, रुपाली पारकर, आरती जेजोन, अमृता ब्रम्हदंडे आदी मान्यवर पदाधिकारी व शिक्षक वृंद उपस्थित होते. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा तपासणी करीता आलेल्या समितीने खारेपाटण केंद्र शाळेच्या अंतरंग व बाह्यरंगाची संपूर्ण पाहणी केली. शासनाने ठरवून दिलेल्या प्रश्नावली व निकक्षा प्रमाणे शाळेची तपासणी केली.