देवगड (प्रतिनिधी) : उच्च न्यायालय मुंबई, महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण – मुंबई व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण- सिंधुदुर्ग ओरोस यांनी दिलेल्या निर्देशास अनुसरून तालुका विधी सेवा समिती देवगड व तालुका बार असोसिएशन- देवगड यांच्या संयुक्त विद्यमाने कुणकेश्वर महाशिवरात्रीनिमित्त १८ व १९ फेब्रुवारी रोजी श्री देव कुणकेश्वर मंदिराच्या आवारात कायदेविषयक मार्गदर्शन शिबीर घेण्यात आले. शिबिरांतर्गत कायदेविषयक जनजागृती व प्रचार करण्यासाठी माहितीपत्रकांचे वाटप करण्यात आले.
कुणकेश्वर महाशिवरात्रीनिमित्त कुणकेश्वर मंदिर आवारात कायदेविषयक जनजागृती करण्यासाठी मांडण्यात आलेल्या स्टॉटला प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण- सिंधुदुर्ग ओरोसचे अध्यक्ष एस. जे. भारुका तसेच विधी व न्याय विभाग, मुंबईचे सचिव आर. डी. सावंत यांनी भेट दिली. यावेळी देवगड दिवाणी न्यायाधीश एस. बी. वाळके यांच्यासह देवगड न्यायालयीन कर्मचारी वर्ग उपस्थित होते. या शिबिराचा असंख्य भाविकांनी लाभ घेतला.