शिवसेना उपजिल्हाप्रमुख पदी विश्वास गावकर यांची निवड

संजय आग्रे यांनी दिले नियुक्तीचे पत्र

मालवण (प्रतिनिधी) : शिवसेना मालवण तालुकाप्रमुख विश्वास गांवकर यांची शिवसेना सिंधुदुर्ग उपजिल्हाप्रमुख पदी नियुक्ती करत त्यांना पक्ष संघटनेत बढती देण्यात आली आहे. या नियुती बाबत माहिती जिल्हाप्रमुख संजय आंग्रे यांनी दिली आहे. कणकवली येथे पक्ष पदाधिकारी यांच्या बैठकीत ही नियुक्ती जाहीर करत विश्वास गांवकर यांना माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत, जिल्हाप्रमुख संजय आंग्रे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. विश्वास गावकर यांची उपजिल्हा प्रमुख (सिंधुदुर्ग) तसेच कणकवली संपर्क प्रमुख पदी नियुक्ती झाली आहे.

यापूर्वी मालवण तालुकाप्रमुख म्हणून विश्वास गांवकर यांनी काम पाहिले. एक हुशार व अभ्यासू व्यक्तिमत्त्व अशी ओळख असलेल्या विश्वास गांवकर यांनी गेल्या काही महिन्यात पक्ष संघटनेत महत्वाची भूमिका बजावली. त्यांची कार्यतत्परता पाहून त्यांना पक्ष संघटनेत मोठी जबाबदारी देण्यात आली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात गतिमान विकास होत आहे. सिंधुदुर्ग जिल्हाही विकासात अग्रेसर रहावा यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मंत्री दीपक केसरकर, मंत्री उदय सामंत, माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत, नेते किरण सामंत, जिल्हाप्रमुख संजय आंग्रे प्रयत्नशील आहेत. या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना सरकारच्या माध्यमातून सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवणे सोबतच पक्ष संघटना वाढवणे यासाठी आपले प्रयत्न राहतील असे विश्वास गांवकर यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!