ओसरगाव टाेल नाक्यावर गाेवा बनावटीचा दारु साठा जप्त

महामार्ग पाेलिसांची दमदार कामगिरी ; दारुचे 60 बाॅक्स जप्त

कणकवली (प्रतिनिधी) : सकाळी १० वा. च्या सुमारास महामार्ग पोलीस गस्त घालत होते. त्यावेळी संशयास्पद टेम्पो दिसून आला. त्याला थांबवून कागदपत्रांची चौकशी केली असता त्याच्याकडून समाधानकारक उत्तर मिळाले नाही. त्यावेळी गाडीची तपासणी करण्यात आली. यात गोवा बनावटीचा मोठा दारूसाठा आढळून आला आहे.

सविस्तर वृत्त असे की, गोव्याहून चिपळूण ला जाणाऱ्या मालवाहू टेम्पोमध्ये लाखो रुपयांच्या गोवा बनावटीच्या दारूचे घबाड सापडून आले. ही कारवाई आज दुपारी महामार्ग वाहतूक पोलिसांनी ओसरगाव टोल नाक्याजवळ केली. यात महामार्ग वाहतूक मदत केंद्र ओसरगाव येथील पोलीस सुमित चव्हाण यांच्या सतर्कतेमुळे या टेम्पो चालकाची चलाखी पकडली गेली. किराणा मालाची वाहतूक करणारा हा टेम्पो चालक गणेश गजानन काळसेकर (२४ निरवडे सावंतवाडी) हा गोव्याहून चिपळूणच्या दिशेने जात होता. अशी माहिती महामार्ग वाहतूक पोलीस मदत केंद्र ओसरगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर फाटक यांनी दिली. ओसरगाव टोल नाक्याजवळील कार्यरत असणान्या वाहतूक पोलिसांना या टेम्पो चालकावर संशय आला. म्हणून त्यांनी कागदपत्र तपासणीसाठी गाडी थांबवली. गाडीच्या मागील भागात किरकोळ साहित्य असताना टायर दबलेल्या स्थितीत व गाडी हेलकावे खात असल्याचे निदर्शनास आल्याने पोलिसांनी टेम्पो चालकाला थांबवून त्याच्याकडे विचारणा केली. यावेळी टेम्पो चालकाने टेम्पोच्या मागील भागात दारू लपवण्यासाठी चालकाच्या सीटच्या व मागील हक्याच्या मधील भागात एक कप्पा करत चोरटी दारू वाहतूक करण्याची शक्कल लढवल्याचे निदर्शनास आले. टेम्पोच्या टपामध्ये देखील त्या चालकाने एक कप्पा केला होता. या दोन्ही कप्प्यामध्ये मिळून ७५० मिली मापाचे तब्बल ६० बॉक्स असल्याचे निदर्शनास आते. दरम्यान पोलिसांनी चातकाला टेम्पो सह ताब्यात घेत कणकवली पोलिसात आणले. या घटने संदर्भात वाहतूक पोलीस सुमित चव्हाण हे फिर्याद दाखल करत असून, वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर फाटक, हवालदार सुनील वेगुर्लेकर कैलीस डिसोजा, देवेंद्र जाधव, आदी या कारवाईदरम्यान उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!