राजापुरात नाणार-बारसू रिफायनरी प्रकल्प समर्थन समन्वय समिती स्थापन

प्रल्हाद तावडे (विलये), पुरुषोत्तम खांबल (धोपेश्र्वर), संदेश आंबेकर (राजापूर शहर) यांची अध्यक्ष म्हणून निवड

सुहास मराठे, मनोज परांजपे, विनायक कदम हे उपाध्यक्ष, तर समन्वयक म्हणून विद्याधर राणे, सिद्धेश मराठे यांची निवड

रत्नागिरी (प्रतिनिधी) : राजापूर तालुक्यातील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाच्या समर्थनाकरिता पुढची ध्येय धोरणे ठरवण्यासाठी आता नाणार-बारसू रिफायनरी प्रकल्प समर्थन समन्वय समिती स्थापन झाली आहे. नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत सर्व रिफायनरी समर्थकांच्या मान्यतेने ही समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीवर प्रल्हाद तावडे (विलये), पुरुषोत्तम खांबल (धोपेश्र्वर), संदेश आंबेकर (राजापूर शहर) यांची अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. तसेच उपाध्यक्ष सुहास मराठे, मनोज परांजपे, विनायक कदम, सचिव म्हणून रमेश मांजरेकर, सदाशिव तांबडे, सह सचिव म्हणून अमोल सोगम, उल्हास आंबोळकर, समन्वय समिती समन्वयक म्हणून विद्याधर राणे, सिद्धेश मराठे अशा निवडी करण्यात आल्या आहेत. कार्यकारिणी सदस्य म्हणून मन्सूर काझी, संजय वाघधरे, मन्सूर काझी, विलास अवसरे, मिलिंद दांडेकर, तन्मय महाजन, रविकांत रुमडे, हरिश्चंद्र शिर्के, जयंत कदम, एकनाथ खांबल, सुनील कामतेकर, चंद्रकांत मिराशी यांची निवड करण्यात आली आहे. समिती सल्लागार म्हणून निलेश पाटणकर, अविनाश महाजन, प्रकाश आमकर, अनिल करंगुटकर यांची निवड करण्यात आली आहे.

तसेच कायदेविषयक सल्लागार म्हणून ॲड. यशवंत कावतकर, डॉकटर संघटना प्रतिनिधी म्हणून डॉकटर सुनील राणे, नाटे, मच्छीमार संघटना प्रतिनिधी म्हणून संतोष चव्हाण, वकील संघटना प्रतिनिधी म्हणून ॲड. पराग मोदी, शेतकरी संघटना प्रतिनिधी म्हणून प्रकाश भिवंदे, मेडिकल संघटना प्रतिनिधी म्हणून मजीद पन्हळेकर, रिक्षा संघटना प्रतिनिधी म्हणून संतोष सातोसे, सोशल मीडिया प्रतिनिधी म्हणून तन्मय महाजन, अमर वारिसे, पत्रकार संघटना प्रतिनिधी म्हणून विनोद पवार, गोकुळ कांबळे अशा निवडी करण्यात आल्या आहेत.

तसेच राजापूर शहर कार्यकारिणी अध्यक्ष म्हणून युवा व्यावसायिक संदेश आंबेकर यांची निवड करण्यात आली आहे. शहर उपाध्यक्ष म्हणून अद्वैत अभ्यंकर, सुनील भनसारी, ऐजाज बांगी यांची निवड करण्यात आली आहे. राजापूर शहर कार्यकारिणी सदस्य म्हणून हुसैन मुंगी, सूरज पेडणेकर, इरफान चौगुले, सलाम खतीब, सिराजुद्दीन साखरकर यांची निवड करण्यात आली आहे. भविष्यात कार्यकारिणी सदस्य म्हणून आणखी काहींच्या निवडी करण्यात येतील. संघटना वाढीसाठी काही रिफायनरी समर्थक मान्यवरांचा संघटनेत सहभाग करून घेण्यात येणार आहे. तसेच लवकरच मीडिया आणि स्थानिक वृत्तपत्रांशी नियमित संवाद साधण्यासाठी प्रवक्त्यांची नियुक्ती करण्यात येणार असल्याची माहिती सिद्धेश मराठे यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!