समर्थ महिला शक्ति प्रतिष्ठान व माविम महिला बचत गट, ग्लोबल फाऊंडेशन पिंगुळी चे आयाेजन
कुडाळ (प्रतिनिधी) : बाव ग्रामपंचायत येथे समर्थ महिला शक्ति प्रतिष्ठान व माविम महिला बचत गट, ग्लोबल फाऊंडेशन पिंगुळी या सर्वांच्या सहकार्याने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन दंत चिकित्सक डॉ साक्षी तेली हिच्या हस्ते दीपप्रज्वलन व सावित्रीबाई फुले च्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन करण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर डॉ प्रणव प्रभू, दिपक राऊत,मिर्नवास परब,आशिष परब, गौरी सामंत,ग्रा.प सद्स्य,सविता सुतार, ग्रा. पण. स,सानिका परब,ग्रा. प. स. प्रमोद कदम, ग्रा प. स. तसेच बांव ग्रामस्थ.दिलीप परब प्रशात परब दिपक राऊत रामदास परब प्रकाश राणे.मनोहर टोपले, मंगेश मांजरेकर, नागेश करलकर, तंटामुक्ती अध्यक्ष आदि मान्यवरांच्या उपस्थितीत झाले
या आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ 117 रुग्णांनी घेतला यावेळी 87 रुग्णांची नेत्रतपासणी,85 रुग्णांची रक्त तपासणी,117 रुग्णांची जनरल आरोग्य तपासणी तर 68 रुग्णांची दंत चिकित्सा करण्यात 10 मोतीबिंदू रुग्ण तर 36 नेत्रदोष तर दातांचे 48 रुग्ण मिळाले सदर आरोग्य तपासणी शिबिर यशस्वी होण्यासाठी समर्थ महीला प्रतिष्ठान च्या अध्यक्ष स्वामिनी परब, उपाध्यक्ष पुर्वा परब, सचिव दिपश्री राऊत, खजीनदार अश्विनी आसोलकर,गौरी सामंत, हेमा राणे,सुजाता राणे, मजुंश्री मांजरेकर,संजना मयेकर, मनाली टोपले, अस्मीता मांजरेकर, अनुजा आसोलकर पदाधिकारी नी विशेष मेहनत घेतली