चौके (प्रतिनिधी) : राज्य लोकसेवा हक्क आयुक्त ( कोकण व नागपूर विभाग ) अभय यावलकर यांनी सिंधुदुर्ग दौऱ्यावर असताना नुकतीच महा इ सेवा केंद्र काळसे ला धावती भेट दिली. यावेळी त्यांनी महा इ सेवा केंद्राच्या कामकाजाचा व अडीअडचणींचा आढावा घेतला आणि मार्गदर्शन केले. यावेळी महा इ सेवा केंद्रचालक किशोर पेंडूरकर , सीमा पेंडूरकर , बाळू खोत , सारिका सरमळकर आदि जण उपस्थित होते.