आंबोली (प्रतिनिधी) : काल सायंकाळी ५ च्या सुमारास आपल्या आंबोली येथे शिकत असलेल्या मुलाला भेटून घरी परत येणाऱ्या चंद्रकांत सहदेव चव्हाण (राहणार म्हापण चव्हाणवाडी ता. वेंगुर्ला) या युवकाला एका भरधाव एक्सयूव्ही चारचाकीने पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात त्यांच्या उजव्या पायाला गंभीर दुखापत झालेली असून उपचारासाठी त्यांना तातडीने कुडाळ येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. चंद्रकांत चव्हाण यांच्या समवेत त्यांचे मित्र विजय पेडणेकर हेही दुचाकीवर प्रवास करत होते त्यांना किरकोळ दुखापत झालेली आहे.