अबब.! तब्बल 425 कोटींचे ड्रग्ज जप्त

सिंधुदुर्ग ( ब्युरो न्युज ) : गुजरातमध्ये एटीएसने मोठी कारवाई केली आहे. अरबी समुद्रातून 425 कोटींचे ड्रग्ज जप्त करण्यात आले आहेत. भारतीय तटरक्षक दलाने आपल्या दोन गस्ती जहाजांना गस्तीसाठी अरबी समुद्रात तैनात केले. असे गुजरात दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) सामायिक केलेल्या गुप्त माहितीच्या आधारे समजते. गुजरातमधील अरबी समुद्रात भारतीय हद्दीत 5 क्रू आणि 61 किलो अंमली पदार्थ असलेली इराणी बोट अडवली. या 61 किलो अंमली पदार्थाची किंमत 425 कोटी रुपये इतकी आहे. या इराणी बोटीतून सुमारे 425 कोटी रुपयांचे सुमारे 61 किलो हेरॉइन जप्त करण्यात आले आहे. सध्या पुढील तपासासाठी बोट ओखा येथे आणण्यात आली असल्याची माहिती पीआरओ डिफेन्स गुजरातने दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!