आचरा (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील त्रिंबक गावची वार्षिक देव डाळपस्वारी उद्या सोमवार 23 डिसेंबरला होत असून सकाळी देव तरंग श्री देव रामेश्वर मंदिर येथून निघून श्री देवी सातेरी मंदिरात भेट देऊन श्री आकारी ब्राह्मण देव मंदिर येथे दुपारी पोचून महाप्रसाद व रात्री वस्तीला राहणार आहेत.
दुसऱ्या दिवशी मंगळवार 24 डिसेंबर रोजी सकाळी देऊळवाडी येथून फिरत दुपारी श्री देवी पावणाई मंदिर देऊळवाडी येथून संध्याकाळी साटमवाडी येथे रात्री विश्रांती घेणार आहेत.
बुधवार 25 डिसेंबर रोजी देवांची डाळपस्वारी साटमवाडी येथून निघून पलीकडचीवाडी बागवेवाडी, आरेकरवाडी येथून श्री देवी सातेरी मंदिर येथे पोहोचणार आहे. तसेच 27 डिसेंबर रोजी रात्रौ 10 वाजता श्री रामेश्वर मंदिर येथे ‘चेंदवणकर दशावतार नाट्य मंडळ, कवठी यांचा दशावतार नाट्य प्रयोग सादर होणार आहे.